श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच इस्रो लवकरच एक नवी झेप घेण्यासाठी सिद्ध झालीये. 'चांद्रयान 2' या मानवरहित मोहिमेची सुरूवात 2018च्या पहिल्या तिमाहीमध्ये होईल, असं इस्रोचे अध्यश्र ए.एस. किरण कुमार यांनी जाहीर केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मोहीमेसाठी संपूर्ण देशी बनावटीचं अंतराळयान वापरण्यात येणार असून त्याची चाचणी सुरू आहे. 'चांद्रयान 2'च्या माध्यमातून ऑर्बिटर, लँडर, रोव्हर याच्या सहाय्यानं चंद्राच्या पृष्ठभागाचा आणखी बारकाईनं अभ्यास करण्यात येईल, असं किरण कुमार यांनी स्पष्ट केलं. 


2008मध्ये 'चांद्रयान 1' मोहीम प्रचंड यशस्वी ठरली होती. या यानानं चंद्राचे अनेक फोटो पाठवले. तसंच 'चांद्रयान 1' मोहीमेनं चंद्राच्या पृष्ठभागावर असलेले पाण्याचे साठे शोधल्याचाही दावा केला जातो. त्यानंतर मंगळयान मोहिेमेचं जगभरात कौतुक झालं. 


आता पुन्हा एकदा अंतराळात मोठी झेप घेण्यासाठी देश सज्ज झाला असून चांद्रयान 2देखील पूर्वीच्या मोहिमांइतकीच यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे.