INDIA VS BHARAT : देशात सध्या भारत नावावरुन महाभारत सुरु आहे. इंग्रजी भाषेत भारताचा उल्लेख इंडिया असा केला जातो.. त्याऐवजी भारत असाच उल्लेख असावा, यासाठी राज्यघटनेत सुधारणा करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. स्वतंत्र्याच्या 76 वर्षांनंतर देशात 'इंडिया' वरुन चर्चा सुरु झाली आहे. इंडिया की भारत याचे पडसाद आता राजकीय पटलावरही उमटू लागले आहेत. पण भारतीयांना प्रश्न पडला आहे तो म्हणजे इंडिया नाव हटवल्यावर कोणत्या गोष्टी बदलणार? अनेक संस्था, ऐतिहासिक ठिकाणं यांच्या नावापुढे इंडिया नाव जोडलं गेलं आहे त्यातही बदल होणार का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडिया नाव हटवल्यावर काय होणार?
इस्रोने नुकतंच मिशन चांद्रयान-3 मोहिम यशस्वी करुन दाखवली. जगभरात ISRO अर्थात Indian Space Research Organisation ने आपली छाप उमटवली आहे.. पण इंडिया नाव हटवण्याच्या चर्चेनंतर आता सोशल मीडियावर नवा वाद सुरु झाला आहे. अनेकांनी X (Twitter) वर  #BSRO (Bharat Space Research Organisation) ने ट्विट केलं आहे. 


अशी अनेक नावं आहेत ती इंडिया शब्दाशी जोडली गेली आहेत. भारताची ओळख असलेल्या दिल्लीतल्या इंडिया गेटला ऐतिहासिक महत्व आहे. पण इंडिया नाव हटवल्यास ते भारत द्वार (INDIA GATE) नावाने ओळखलं जाईल. हजारो मुलं IIT आणि IIM ची तयारी करत असतात. पण इंडिया नाव हटवलं तर मुलं आयआयटीची (Indian Institutes of Technology) तर BIT ची तयारी करतील. Indian Institutes of Management म्हणजे आआयएमचं नावही बदललं जाईल. 


केंद्र सरकारच्या अनेक योजना, स्लोगन आणि प्रोजेक्ट इंडिया नावाने ओळखल्या जातात. म्हणजे पढेगा इंडिया, तो बढेगा इंडिया, मेक इन इंडिया, स्टॅंड अफ इंडिया, स्टार्ट अप इंडिया, डिजिटल इंडिया, खेलो इंडिया, स्किल इंडिया इत्या... अशा अनेक योजना आणि स्लोगन बदलल्या जातील. ऑल इंडिया रेडिओ, भारताचा रेडिओ म्हणून ओळखला जाईल. IPS, IAS अधिकाऱ्यांची ओळख काय असणार. सर्वात महत्वाचं म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या नावाचं काय होणार? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. 


बॉलिवूडचं काय होणार?
इंडिया नाव हटवल्यावर याचा परिणाम बॉलिवूडरही दिसू शकतो. शाहरुख खानचा सुपरहिट परदेस या चित्रपटात एक गाणं होतं 'आय लव माय इंडिया' अनेक चित्रपट आणि हिंदी गाण्यांमध्ये इंडिया शब्दचा उल्लेख आढळतो. जुना चित्रपट 'मदर इंडिया', सनी देओलचा 'इंडियन' असे अनेक चित्रपट आहेत.