नवी दिल्ली : अंतराळ क्षेत्रातही भारत लवकरच गगनभरारी घेणार आहे.  भारताच्या गगनयान मोहिमेला हिरवा कंदील देण्यात आला आहे. या गगनयान मोहिमेद्वारे ३ अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येणार असून १० हजार कोटी रूपयांच्या मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत  मंजुरी देण्यात येणार आहे. शुक्रवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. गगनयान मोहिमेला परवानगी मिळाल्याने देशाच्या अंतराळ क्षमतेत वाढ होणार आहे. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधानांनी 2022 पर्यंत भारत अंतराळात जाईल अशी घोषणा केली होती. 2022 म्हणजेच स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात 'गगनयान'च्या माध्यमातून भारत अंतराळात तिरंगा घेऊन जाईल. देशाचा मुलगा किंवा मुलगी या मोहिवेवर भारताचा झेंडा घेऊन जाईल असेही त्यांनी सांगितले होते.


पंतप्रधानांची आश्वासनपूर्ती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधानांनी 2022 पर्यंत भारत अंतराळात जाईल अशी घोषणा केली होती. 2022 म्हणजेच स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात 'गगनयान'च्या माध्यमातून भारत अंतराळात तिरंगा घेऊन जाईल. देशाचा मुलगा किंवा मुलगी या मोहिवेवर भारताचा झेंडा घेऊन जाईल असेही त्यांनी सांगितले होते. 



15 हजार नोकऱ्या 


चंद्रयान-1 (ऑक्टोबर 2008) आणि मंगळयान (सप्टेंबर 2014) यानंतरची ही सर्वात मोठी मोहिम असणार आहे. या मोहिमेमुळे भारतात 15 हजार नोकऱ्या निर्माण होणार असल्याचे इस्त्रोचे प्रमुख सिवान यांनी सांगितले होते. ही महत्त्वाकांक्षी मोहिम यशस्वी होण्यासाठी भारताने रशिया आणि फ्रांसशी करार केले आहेत.