नवी दिल्ली : पुलवामा येथे लष्करी जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा देशभरातून निषेध होत आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कॅबीनेटची मिटींग संपली आहे. पाकिस्तानची राजनैतिक गळचेपी करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. पाकिस्तानचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्यात येईल असे अरुण जेटली यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत शहीदांना श्रद्धांजली देण्यात आली. या हल्ल्यानंतर देशात आक्रोश आहे ते मी समजू शकतो. आमच्या सुरक्षा बऴांना पू्र्ण स्वातंत्र्य दिले गेले आहे. आम्हाला आमच्या लष्करावर पूर्ण विश्वास आहे. दहशतवाद्याने खूप मोठी चूक केली आहे आणि त्यांना याचे उत्तर मिळेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. काश्मिर घाटीत शांतता कायम राहावी यासाठी महत्त्वाची पाऊले उचलली जातील असेही जेटली यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यांनी हा गुन्हा केलाय आणि ज्यांनी त्यांना पाठींबा दिला आहे त्यांना त्याचे कठोर उत्तर मिळेल असा सज्जड दम देखील भारतातर्फे देण्यात आला आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह आज श्रीनगरमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतील


44 जवान शहीद 


हा हल्ला घडवून आणणाऱ्या अहमद डारने श्रीनगर-जम्मू राजमार्गावर आपली विस्फोटकांनी भरलेली एसयूव्ही सीआरपीएफच्या बसवर ठोकली. यातून मोठा स्फोट झाला आणि 44 जवान शहीद झाले तर अनेकजण जखमी झाले. पाकिस्तानात असलेल्या जैश-ए-महम्मद ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या दहशतवादी संघटनेने आत्मघातकी हल्ला करणाऱ्याचा व्हिडीओ जारी केला आहे जो त्याने हल्ला करण्याआधी शूट केला होता. हा हल्ला श्रीनगरपासून 30 कि.मी असलेल्या लेथपोरामध्ये झाला. दहशतवादी संघटनेचा एक कमांडर आदिल अहमद दार हा आत्मघाती हल्लेखोर होता असे संघटनेने सांगितले.