पणजी : तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी भारताच्या फाळणीविषयी वक्तव्य केलं आहे. जवाहरलाल नेहरू यांच्याऐवजी मोहम्मद अली जिन्नांना भारताचं पंतप्रधान केलं असतं तर भारताची फाळणी झाली नसती, असं दलाई लामा म्हणाले. जिन्नांनी पंतप्रधान व्हावं, असं महात्मा गांधींनाही वाटत होतं, पण पहिला पंतप्रधान होण्यासाठी नेहरुंनी आत्मकेंद्रीत वृत्ती अवलंबली, असं वक्तव्य दलाई लामा यांनी केलं आहे. गोवा प्रबंध संस्थेच्या एका कार्यक्रमासाठी दलाई लामा पणजीमध्ये आले होते.


महात्मा गांधी जिन्नांना पंतप्रधान बनवण्यासाठी इच्छुक होते, पण पंडित जवाहरलाल नेहरूंना हे स्वीकार नव्हतं. जर महात्मा गांधींची इच्छा पूर्ण झाली असती तर आज भारत-पाकिस्तान एक असते. नेहरु हे अनुभवी आणि बुद्धीवान होते पण काही वेळा चुका होत असतात, अशी प्रतिक्रिया दलाई लामांनी दिली.