बंद झालं Facebook ? हे आहे सर्वात मोठं कारण
डेटा चोरी प्रकरणात फेसबुक खूप कठीण प्रसंगातून जात आहे. मार्क झुकरबर्गने माफी मागितल्यावरही कंपन्या आता फेसबुकवर जाहिराती देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे मार्कच्या संकटात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे आता फेसबुक लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहे का? अशी चर्चा होत आहे.
मुंबई : डेटा चोरी प्रकरणात फेसबुक खूप कठीण प्रसंगातून जात आहे. मार्क झुकरबर्गने माफी मागितल्यावरही कंपन्या आता फेसबुकवर जाहिराती देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे मार्कच्या संकटात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे आता फेसबुक लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहे का? अशी चर्चा होत आहे.
अमेरिका, ब्रिटनसारख्या इतर देशाप्रमाणे टॉप इंडियन जाहिरातीकंपनींनी फेसबुकवर जाहिराती देण्यास नकार दिला आहे. तसेच कॅम्ब्रेज एनालिटिका प्रकरणात फेसबुककडे स्पष्टीकरण देखील मागितली आहे.
कंपन्यांनी बंद केल्या जाहिराती
कंपन्यांनी आता फेसबुकला जाहिरात देण्यात बंद केलं आहे. मॅगी विवादानंतर नेस्लेने आपल्या मॅगी न्यूडल्सच्या प्रमोशनसाठी फेसबुकचा भरपूर उपयोग केला होता. मात्र आता फेसबुक सुरक्षित नसल्यामुळे हा प्रश्न उद्भवला आहे. नेस्लेने सांगितले आहे की, ग्राहकांची सर्व विश्वासार्हता ही ऑफलाईन आणि ऑनलाईन असणं महत्वाची अाहे.
डिजिटल जाहिरातीत वाढ
स्मार्टफोनचा वापर वाढल्यामुळे डिजिटल जाहिरातीत वाढ होत आहे. आतापर्यंत 8200 करोड भारतीय डिजिटल जाहिरात इंडस्ट्रीमध्ये गुंतले आहेत. 2020 पर्यंत 32 टक्के सीएजीआरहून वाढून 18896 करोड रुपयांपर्यंत होणार आहे.
या कंपन्यांनी फेसबुककडे फिरवली पाठ
नेस्लेच्या पाठोपाठ ITC ने देखील फेसबुककडे पाठ फिरवली आहे. तसेच पेप्सिको इंडियाचे सिनिअर वीपी यांनी देखील सांगितल की, सोशल मीडियावर कोणताही ग्राहक त्या ब्रँडला विश्वासावर आणि प्रामाणिकतेवर विश्वास ठेवून महत्व देतात. पण आता ही विश्वासार्हता थोडी धोक्यात आली आहे.