नवी दिल्ली : शूटर रवि कुमार आणि दीपक कुमार यांना भारतीय वायु सेनेने पुन्हा कामावर परतण्यास सांगितले आहे. दोन्ही शूटर्सना यासंदर्भात माहिती निर्देश देण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. याला उत्तर देण्यासाठी भारतीय वायु सेनेने मंगळवारी पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला हवाई हल्ला केला. आज (बुधवारी) पाकिस्तानची लढाऊ विमाने भारतीय क्षेत्रात आल्यानंतर तणाव आणखी वाढला. या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्हाला वायु सनेच्या खेळ नियंत्रण बोर्डाच्या सचिवांनी बोलावल्याचे आयएसएसएफ वर्ल्डकपमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या रवि कुमारने सांगितले आहे. हा सामान्य आदेश आहे. जो प्रत्येक टुर्नामेंटनंतर जारी केला जातो. यामध्ये आम्हाला भविष्यातील योजनांबद्दल विचारले जाते. वर्तमान स्थितीच्या अनुसार आम्हाला निर्देश दिले जातील आणि आम्ही त्या प्रोटोकॉलचे पालन करु असेही रवि कुमारने सांगितले. 


रवि हा वायुसेनेच्या ग्राऊंड स्टाफमध्ये आहे. आपण ज्यूनियर वॉरंट ऑफिसर असल्याचे त्याने सांगितले. पाच-सहा पोस्ट वर लक्ष ठेवण्याचे त्याचे काम असते. गरज पडली तर देशासाठी काहीही करायला तयार असल्याचे त्याने सांगितले.  


तर दीपक कुमार हा सार्जेंट म्हणून कार्यरत आहे. आम्हाला कमांडेटने बोलावले आहे. ही सामान्य प्रक्रिया आहे. त्यांच्याशी काय बोलणे होईल हे पाहुया...आम्ही त्यांच्या निर्देशांचे पालन करु असेही तो म्हणाला. दीपकने वर्ल्डकपमध्ये कांस्य आणि आशियाई खेळांमध्ये रजत पदक जिंकले आहे.