Air Force Job: बारावी उत्तीर्ण आहात? भारतीय हवाई दलात नोकरीसाठी `येथे` पाठवा अर्ज
Air Force Job: भारतीय हवाई दल अग्निवीर वायु भरती 2023 साठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे.
Air Force Job: देशातील बारावी उत्तीर्ण उमेदवारांना चांगल्या पदाची सरकारी नोकरी मिळू शकणार आहे. भारतीय वायुसेनेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध केले जाणार असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा शेवटचा तपशील देण्यात आला आहे.
भारतीय हवाई दलात अग्नीवीर भरती करण्यात येत आहे. याअंतर्गत एकूण 3500 पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. बारावी उत्तीर्ण उमेदवार यासाठी अर्ज पाठवू शकतात.
भारतीय वायुसेना अग्निवीर वायु भरती 2023 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 250 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून हे शुल्क भरता येणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 27 जून 2003 ते 27 डिसेंबर 2006 दरम्यान झालेला असावा. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेतही सवलत दिली जाणार आहे.
अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिक तपशील अधिकृत वेबसाइटवर तपासले जाऊ शकतात.
भारतीय हवाई दल अग्निवीर वायु भरती 2023 साठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे.
भारतीय वायुसेना अग्निवीर वायु भरती 2023 परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असेल तर परीक्षेत ०.२५ गुणांचे निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आले आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्या.
Agniveer Job: पुढीलप्रमाणे करा अर्ज
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
वैयक्तिक तपशील भरुन सबमिट करा.
यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करून लॉगिन करा.
त्यानंतर फॉर्म भरा आणि सबमिट करा.
यानंतर फी आणि कागदपत्रे अपलोड करून अंतिम सबमिट करा.
एअरफोर्स रिक्रूटमेंटची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.
भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 27 जुलै 2023 पासून सुरू होतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2023 आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
मिरा भाईंदर पालिकेत बंपर भरती
मिरा भाईंदर महानगरपालिकामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी बारावी उत्तीर्ण ते एमडी रेडीओलॉजीपर्यंतचे शिक्षण झालेल्या सर्व उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. उमेदवारांना त्यांच्या पदानुसार पगार दिला जाणार आहे. मीरा भाईंदर पालिकेत विविध पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवारांनी आपले अर्ज सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर पश्चिम, ठाणे-401101 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. 31 ऑगस्ट ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे.