दहशतवाद्यांचा खात्मा करणारे शहीद गरूड कमांडो जेपी निराला यांना अशोक चक्र
राजपथावर आज जेपी निराला यांच्या पत्नी आणि आईंकडे हे अशोक चक्र सोपवण्यात आलं.
नवी दिल्ली : १८ नोव्हेंवर २०१७ ला जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना धडा शिकवणारे वायुसेनेचे जवान गरूड कमांडो जेपी निराला यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. राजपथावर आज जेपी निराला यांच्या पत्नी आणि आईंकडे हे अशोक चक्र सोपवण्यात आलं.
भारताच्या इतिहासात दुस-यांदा भारतीय वायुसेनेच्या गरूड कमांडोला अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले. १८ नोव्हेंबरला दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत निराला हे शहीद झाले होते.
सर्वोच्च सैन्य सन्मान
निराला यांचं शौर्य पाहून त्यांन वन मॅन आर्मी म्हटले गेले होते. त्यांना त्यांच्या अद्वितीय अशा कामगिरीसाठी अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले. निराला यांच्याआधी १९७१ मध्ये भारतीय वायुसेनेचे राकेश शर्मा यांना अशोक चक्राने सन्माने करण्यात आले होते.
कुख्यात दशतवाद्यांचा खात्मा
१८ नोव्हेंबरला दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीवेळी हे स्पेशल ड्युटीवर बांडीपोरमध्ये तैनात होते. निराला वायुसेनेच्या गरूड कमांडोच्या त्या टीममध्ये होते ज्या टीमने कुख्यात दहशतवादी जकी उर रहमान लखवीचा भाचा ओसामा जंगी याला मारले होते. या एन्काऊंटरमध्ये भारतीय सेनेने ६ दहशतवाद्यांना ठार केले होते.
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ कमांडो निराला
या चकमकीमध्ये दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्यासाठी जेपी निराला यांनी त्यांच्या एके ४७ रायफलमधून गोळीबार सुरू केला. त्यांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.