मुंबई : तुमची जर भारतीय हवाई दलात (Indian Air Force) सामील होण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. भारतीय वायुसेनेने अनेक युनिटमधील ग्रुप सीच्या सिव्हीलीयन पदांवर नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइट indianairforce.nic.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 मे 20201 आहे. महत्त्वाचे तपशील जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Indian Air Force Recruitment 2021: या भरतीमध्ये स्टेनोग्रफर, सीनियर कंप्यूटर ऑपरेटर, कुक, हाउस कीपिंग स्टाफ, MTS, LDC, CS & SMW, Supdt (Store), कारपेंटर, लॉन्ड्रीमॅन, हिंदी टाइपिस्ट सारख्या एकूण 1524 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीची नोटिफिकेशन आणि ऍप्लीकेशन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी IAFच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.


वॅकेंसी डीटेल्स


वेस्टर्न एयर कमांड यूनिट - 362 पद
साउदर्न एयर कमांड यूनिट - 28 पद
ईस्टर्न एयर कमांड यूनिट - 132 पद
सेंट्रल एयर कमांड यूनिट - 116 पद
मॅन्टेनन्स कमांड यूनिट - 479 पद
ट्रेनिंग कमांड यूनिट - 407 पद


कोण करू शकेल अर्ज?


या भरतीसाठी दहावी, बारावी आणि पदवीधर पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. सिव्हीलीयन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, कुक, पेंटर या पदांसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. लोअर डिव्हिजन लिपिक (LDC), स्टेनोग्राफर, हिंदी टायपिस्ट आणि स्टोअर कीपर या पदांसाठी १२ वी पास असलेले उमेदवार तर, कंप्यूटर ऑपरेटर आणि Supdt (स्टोर) या पदासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात.


वयोमर्यादा


IAF च्या भर्तीसाठी नमुद केलेल्या सर्व पदांचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्षे आहे. तसेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे, अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना 5 वर्षे आणि अपंग उमेदवारांना जास्तीत जास्त 10 वर्षे वयाची मुदत वाढ दिली आहे.


निवड प्रक्रिया


शॉर्टलिस्टेड उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. लेखी परीक्षा  शैक्षणिक पात्रतेवर आधारित असेल. सर्व शॉर्टलिस्टेड उमेदवारांना अर्जासह मूळ कागदपत्रे आणावी लागतील. लेखी परीक्षेत जनरल इंटेलिजेंस आणि रीझनिंग, न्यूमेरिकल एप्टीट्यूड, जनरल इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस संदर्भातील प्रश्न विचारले जातील. पेपर आणि उत्तरपत्रिकेची भाषा इंग्रजी आणि हिंदी आहे.