नवी दिल्ली : जेट एअरवेजच्या ढिसाळ कारभारामुळे भारतीय विमानसेवा क्षेत्रच डबघाईला येण्याची भीती खासदार अमर सिंह यांनी राज्यसभेत व्यक्त केलीय. 


जेट एअरवेज भोंगळ कारभार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाय जेट एअरवेजच्या व्यवस्थापनात असणाऱ्या भोंगळ कारभाराच्या बातम्या अनेक वेळा वृत्तपत्रांमधून छापून आल्या आहेत. तरीही कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.  


विमान प्रवाशांना नसता मनस्ताप


अमरसिंहांनी यावेळी जेट एअरवेजचे पायलट उशिरानं कामावर आल्यानं विमान प्रवाशांना नसता मनस्ताप आणि उशिर होत असल्याचंही म्हटलंय.


विमानसेवेचा दर्जा सुमार


जेट एअरवेजच्या या अशा कारभारामुळेच भारतीय विमानसेवेचा दर्जा सुमार असल्याचं संयुक्त राष्ट्राच्या विमानसेवा परीक्षणात समोर आल्याचंही अमरसिंहांनी यावेळी म्हटलंय.