मुंबई : आतापर्यंत अनेक बँकांच दुसऱ्या बँकेत विलिनिकरण करण्यात आले आहे. यामुळे खातेधारकांच्या अडचणीत वाढ झाली. अलाहाबाद बॅंकेत ज्या खातेधारकाचं खातं होतं त्याचं खातं इंडियन बॅंकेत ट्रान्सफर करण्यात आलं. या विलिनिकरणामुळे खातेधारकांना त्यांचा आयएफएससी (IFSC) कोड लक्षात ठेवावा लागणार आहे. तसेच आवश्यक तिथे प्रत्येक ठिकाणी हा कोड अपडेट करावा लागणार आहे जिथून रक्कम येणार आहेत. तसेच जर तुम्ही कोणाला तुमचे बॅंकसंबंधित माहिती देत असाल, तर तुम्हाला हा कोड लक्षात ठेवावा लागणार आहे. (indian and allahabad  bank merger bank know how to  new IFSC code)   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँक विलिनिकरणामुळे आयएफएससी कोडमध्येही बदल करण्यात आले आहे. बॅंक व्यवहारात आयएफएससी कोडचे फार म्हत्तव आहे. त्यामुळे खातेधारकांना त्यांचं नवीन आयएफएससी कोड माहिती करुन घ्यावा लागणार आहे. त्यानंतर तो कोड प्रत्येक आवश्यक त्या ठिकाणी नमूद करावा लागणार आहे.  


आता  ज्या ग्राहकांचं खातं हे अलाहाबाद बॅंकेत होतं त्याचं खातं इंडियन बॅंकेत ट्रान्सफर करण्यात आलं आहे. या खातेधारकांच्या आयएफएससी कोडची सुरुवात  IDIB पासून होणार आहे, अशी माहिती बॅंकेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे खातेधारकांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी. अन्यथा तुम्हाला बॅंक व्यवहार करता येणार नाहीत.  


सध्या जुन्या आयएफएससी कोडच्या मदतीने बॅंक व्यवहार सुरु आहेत. पण 1 जुलैनंतर खातेधारकांना व्यवहार करता येणार नाही. त्यामुळे खातेधारकांनी बॅंकने दिलेल्या सूचनाचं पालन वेळेत करावं.  


असं जाणून घ्या नवा आयएफएससी कोड


खातेधारक  नवा आयएफएससी कोड  indianbank.in या अधिकृत वेबसाइटवरुन जाणून घेऊ शकतात. तसेच एसएमएसद्वारेही हा आयएफएससी कोड जाणून घेऊ शकता. यासाठी खातेधारकाला 9266801962 या क्रमांकावर  IFSC <space> <Old IFSC> असा मेसेज करावा लागेल. 


संबंधित बातम्या : 


PAN CARD नंबर म्हणजे तुमची संपूर्ण आर्थिक कुंडली...पाहा काय आहे त्या अक्षरांचा अर्थ....


खुशखबर... रेल्वेचं तत्काल तिकिट कॅन्सल केलं तर पैसे परत मिळणार...पण किती आणि नेमक्या अटी काय?