भारत आणि चीनच्या सैनिकांत धक्काबुक्की
भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या तणावानंतर आता एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत भारत-चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं दिसत आहे. (व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
लडाख : भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या तणावानंतर आता एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत भारत-चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं दिसत आहे. (व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. लडाख प्रदेशातील पँगाँग सरोवर परिसरात भारत-चीन सैनिकांच्या धक्काबुक्कीची ही घटना झाल्याचं म्हटलं जात आहे.
पँगाँग सरोवर परिसरात भारत आणि चिनी लष्कराचे गस्ती पथक एकमेकांसमोर आले होते. ही घटना १५ ऑगस्ट रोजी घडली असल्याचं बोललं जात आहे.
काही दिवसांपूर्वी चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, चीनने हा दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर हा व्हिडिओ समोर आला आहे.
व्हिडिओत दिसत आहे की, ५० हून अधिक सैनिक दिसत आहेत. लडाख परिसरातील हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या व्हिडिओ संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.
हा एक व्हायरल झालेला व्हिडिओ आहे. या व्हिडिओची सत्यता झी २४ तासने पडताळून पाहिलेली नाहीये.