नवी दिल्ली : भूतानमध्ये भारतीय सेनेच्या चीता हॅलिकॉप्टरला शुक्रवारी अपघात झाला. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात २ वैमानिकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृत्यू झालेल्यांपैकी एक भारतीय सैन्यदलातील लेफ्टनंट कर्नल होते. तर दुसरे भूतानच्या सैन्यदलातील भारतीय सैन्यदलासोबत प्रशिक्षणार्थी असणारे वैमानिक होते. 



भारतीय सेनेचे प्रवक्ता कर्नल अमन आनंद यांनी सांगितले की, भूतानच्या योंगफुल्लाजवळ दुपारी १ वाजता भारतीय सेनेचे हॅलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. हॅलिकॉप्टरचा दुपारी १ वाजता रेडियोशी संपर्क तुटला होता.