नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पुन्हा एकदा चोख  प्रत्युत्तर दिलेय. पाकिस्तानी हल्ल्यात शनिवारी शहीद झालेल्या चार जवानांवरील हल्ल्याचा बदला भारतीय सैनिकांनी घेतला आहे. पाकिस्तानचे तीन सैनिक ठार मारण्यात आलेय.


भारताचे प्रत्युत्तर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात केरी सेक्टर येथे नियंत्रण रेषेजवळ मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासहीत चार सैनिकांना कुरापती पाकच्या हल्ल्यात वीरमरण आलं होतं. याला प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी पाकिस्तानचे तीन सैनिक मारले. 


पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान


भारतीय लष्करांने पुंछमधील रावळकोटच्या रुख चकरी सेक्टरमध्ये पेट्रोलिंग करणाऱ्या तीन पाकिस्तानी सैनिकांना ठार केलेय. या हल्ल्यात पाकिसतानचे पाच सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे एलओसी पार करून पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. 


सर्जिकल स्ट्राईकनंतरची कारवाई


पहिल्या सर्जिकल स्ट्राईकनंतरची भारताने केलेली ही पहिलीच क्रॉस-बॉर्डर रेड होती, असं गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांकडून सांगण्यात आलेय. सोमवारी सायंकाळी ६ वाजता पुंछ येथे सीमेपार पाकिस्तानकडून काही हालचाली सुरु असल्याचे समजतात ही हल्ला करत पाकिस्तानचे तीन सैनिक ठाकर केलेत.


 पाकिस्तान सैनिकांवर हल्ला 


भारतीय जवानांनी सीमेपार जाऊन पाकिस्तान सैनिकांवर हल्ला चढवला. जवानांच्या या हल्ल्यात पाकिस्तानच्या बलूच रेजिमेंटचे तीन जवान ठार झाले आहेत, तर पाच जवान जखमी झाले आहेत.