श्रीनगर : शोपियांमधील रेबेन भागात दशहतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु आहे. DGP जम्मू-काश्मीर दिलबाग सिंह यांनी सांगितलं की, रविवारी सकाळी शोपियांमध्ये सेना, CRPF आणि शोपियां पोलिसांद्वारा सुरु करण्यात आलेल्या ऑपरेशनदरम्यान चकमक सुरु झाली. त्याआधी काही तासांपूर्वी गोळीबार सुरु झाला असून सर्च ऑपरेशन सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या संयुक्त पथकातील 01 आरआर आणि सीआरपीएफने रेबेनमध्ये एक कॉर्डन-अँड-सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. जवानांची ही संयुक्त टीम संशयास्पद ठिकाणी पोहोचताच, लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. जवानांकडूनही कारवाई करण्यात आली आणि चकमक सुरु झाली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती आहे.


चकमकीच्या ठिकाणी, आजूबाजूचे काही लोक जमा झाले. या लोकांनी सुरक्षा दलावर दगडफेकही केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र परिसरात अजूनही तणाव कायम आहे.


दरम्यान, बुधवारी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील कंगन वानपोरा भागात भारतीय सुरक्षा दलाकडून जैश-ए-मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.


सोमवारीदेखील भारतीय सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडला होता. सुरक्षा दलाकडून नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरी करणाऱ्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पाकिस्तानी सेनेची भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याची योजना होती. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सेना भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे.