मुंबई : कोरोनाबाधित व्यक्तींना ओळखण्यासाठी भारतीय लष्करानं (Indian Army ) आपल्या श्वानांना खास (Dog Squad) प्रशिक्षण दिलं आहे.  घामाच्या आणि मुत्राच्या नमुन्यातून संबंधित व्यक्ती करोनाबाधित आहे किंवा नाही हे कळू शकणार आहे. लॅब्रेडोर आणि स्वदेशी जातीच्या काही खास श्वानानांच अशा प्रकारे करोनाबाधित व्यक्तीच्या (Covid-19 ) नमुन्यातून रिअल टाइम शोध घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आलं आहे. नमुन्यांमुळे या श्वानांना संसर्ग होत नाही कारण हे नमुन्यांचे नर्जंतुकीकरण केलं जातं, त्यामुळे त्यामध्ये विषाणू नसतो. यामध्ये केवळ व्होलाटाईल मेटाबोलिक बायोमेकर असतं. या श्वानांनी आत्तापर्यंत ३,००० नमुन्यांची तपासणी केली असून त्यात १८ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिप्पीपराई ब्रीडचे दोन आणि कॉकर स्पॅनियल ब्रीडचा एक श्वान दिल्ली आणि चंदीगड ट्रांझिट कॅम्पमध्ये तैनात करण्यात आले आहेत. यामधील कॉकर स्पॅनियल 2 वर्षांचा असून याचं नाव कॅस्पर असं आहे. एक वर्षांच्या चिप्पीपराई ब्रीडच्या श्वानांची नावे ही जया आणि मनी असे आहे. आतापर्यंत या तिघांनी ३८०० सैनिकांची तपासणी केली आहे. यामधील १८  सैनिकांचे सॅम्पल हे पॉझिटिव्ह सापडले आहेत. 



कोरोना संक्रमणाच्या तपासणीकरता श्वानांचा वापर परदेशातही होत आहे. UAE मध्ये गेल्यावर्षी कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात झाले होते. यावेळी K9 डॉगचा ट्रायल करण्यात आले होते. हे श्वान ९२% कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्यात यश आले आहे. यानंतर या श्वानांना गर्दीच्या ठिकाणी ठेवण्यात आले.