श्रीनगर : भारतीय़ सैन्याकडून रविवारी जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेपाशी असणाऱ्या नियंत्रण रेषेजवळ एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. सैन्यदलाकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावण्यात आला आहे. भारतीय सैन्यदलाच्या प्रवक्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात गस्त घालत असतानाच दैरानच्या केरी सेक्टरजवळ आयईडी असल्याची माहिती मिळाली. ज्यानंतर हे आयईडी निष्क्रिय करण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयईडीच्या माध्यमातून एक मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा दहशतवद्यांचा कट असल्याची बाब यातून उघड झाली. ज्या मार्गिकेजवळ आयईडी सापडलं तेथे कोणतीही हालचाल झाली असता तेथे अतिशय मोठा स्फोट झाला असलता, असं लेफ्टनंट कर्नल देवेंदर आनंद म्हणाले. 



दरम्यान, आयएएनएस या वृत्तसंस्थेला सैन्याशी संलग्न व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीनुसार हे आयईडी पाकिस्तान बॉर्डर ऍक्शन टीम BATने  राजौरी येथील नियंत्रण रेषेपाशी ठेवले होते. पाकिस्तानकडून या भागात बेछूट गोळीबारही करण्यात आला. ज्याचं भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नाही. नॉर्थर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी रविवारी काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बारामुल्लातील सैन्याच्या काही चौक्यांना भेट देत या भागातही पाहणी केली.