नवी दिल्ली : डोकलाम सीमेवरुन भारत आणि चीन या दोन देशांमध्ये सातत्याने तणाव वाढत आहे. या देशांत १६ जूनपासून वाद निर्माण झालाय. भारत हा वाद सोडविण्यासाठी चर्चा करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, चीनकडून सातत्याने उलट-सुलट वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहे. त्यामुळे तणावात अधिक भर पडत आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने सीमेवरील गावे खाली करण्याचे आदेश दिलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनने सातत्याने धमकी देण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने सैन्य पाठी घेतले नाही तर चीन छोट्या स्वरुपात युद्ध छेडेल, अशी कबुली चीनी मीडियाने सरकारी हवाल्याच्या वृत्ताने दिलेय. त्यामुळे तणावात अधिक भर पडलाय. त्यामुळे डोकलाम येथे तणावग्रस्त स्थिती आहे. त्यात भारतीय सैन्य मागे घेण्यासाठी चीन सातत्याने दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे भारतीय लष्कराने डोकलाम परिसरातील अनेक गावे खाली करण्यात आदेश दिलेत.


मीडियाच्या वृत्तानुसार लष्कराने सीमेजवळच्या नाथनांग गावाच्या ग्रामीण भागातील अनेक गावे खाली करण्यास सांगितले आहे. ही गावे डोकलामपासून २५० किमी अंतरावर आहेत. आदेशानुसार सुकना ते डोकलाम येथील गावे ३३ क्रॉपच्या जवानांच्या उपस्थित खाली करण्यात आली आहेत. जर भारत-चीन यांच्यात युद्ध झाले तर नागरिकांचे हाल होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.


दरम्यान, डोकलाम येथे भारत आणि चीन यांचे सैनिक एकमेकांसमोर उभे आहेत. केवळ एक किलोमीटरचे अंतरावर चीनने ८० टॅट लावले आहे. चीन पीपल्स लिब्रेशन आर्मी (PLA)कडून डोकलाम येथे ही मोठी तयारी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे भारतानेही ३५० जवान तैनात केलेत. हे जवान ३० टॅटच्या जवळ आहेत.


भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चीनच्या सैनिकांच्या उपस्थितीबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी सांगितले की, विरुद्ध बाजुने कोणतीही हालचाल नाही. मात्र, भारतीय लष्कराने डोकलाम येथे आपली सैन्य वाढविले आहे.