Indian Army Latest Update : काहींना लहानपणापासून सैनिकांचा गणवेश घालण्याचं वेड असतं. या गणवेशाच्या वेडापायी अनेकजण चक्क भविष्यात लष्करातच करिअर घडवतात. पण, अनेकांचं लक्ष वेधणाऱ्या याच सैनिकी गणवेशाबद्दल आता काही बदल घडताना दिसणार आहेत. भारतीय लष्कराकडून अतिशय महत्वाचा निर्णय घेत साऱ्या देशाच्या नजरा वळवल्या आहेत. या निर्णयामुळं लष्करातील कार्यपद्धतीसुद्धा काही अंशी बदलणार आहे. कारण, आता लष्कराकडून थेट गणवेशातच बदल करण्यात आले आहेत. त्यामुळं ज्या रुबाबदार गणवेशाचीच सर्वाधिक चर्चा होत असते त्याच गणवेशात आता महत्त्वपूर्ण बदल झाल्याची बाब स्पष्ट बहोत आहे. लष्कराच्या निर्णयानुसार आता सर्व अधिकाऱ्यांना एकसारखाच गणवेश असणार आहे. असं असलं तरीही कर्नल आणि त्याखालील रँकवर असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गणवेशात मात्र कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लष्कराच्या सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 1 ऑगस्ट 2023 पासून ब्रिगेडिटर आणि त्यावरील पदावर लष्कराच्या सेवेत असणआऱ्या अधिकाऱ्यांसाठी एकसारखाच गणवेश असणारप आहे. मूळ कॅडर आणि नियुक्ती कोणत्याही पदासाठी असली तरीही त्यांच्या गणवेशात कोणताही फरक नसेल. नुकत्याच झालेल्या एका संमेलनामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विचारविनिमयानंतर हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान या निर्णयानंतर वरिष्ठ पदांवर सेवेत असणाऱ्या अझिकाऱ्यांच्या टोपी, खांद्यावर असणारे बॅज, गोरगेट पॅच, बेल्ट आणि बुटांचं मानकीकरण करण्यात येईल. 


हेसुद्धा वाचा : Secured Credit Card म्हणजे काय रे भाऊ? नेहमीच्या सीसीपेक्षा इथं मिळतात जास्त फायदे 


सर्वसामान्य ओळख आणि नव्या दृष्टीकोनाला चालना देण्यासाठी आणि वरिष्ठ नेतृत्त्वांमध्येही सराईत होण्यासाठी ब्रिगेडियर आणि त्यावरील रँकच्या अधिराऱ्यांना समान गणवेशाचा निर्णय घेण्यात आला आहे. 


ब्रिगेडियर आणि त्यावरील अधिकारी नेमके कुठे सेवेत असतात ? 


भारतीय लष्करामध्ये ब्रिगेडियर आणि त्यावरील पदांवर सेवेत असणारे अधिकारी ते असतात ज्यांना बटालियनच्या नेतृत्त्वाचा अनुभव असतो आणि त्यांना मुख्यालय किंवा एखाद्या संस्थेमध्ये सेवा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली असते. लष्कराच्या या ऐतिहासिक निर्णयामुळं आता सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांची सर्वसमावेशक ओळख असणार आहे.