नवी दिल्ली : भारतीय सैन्याचे सामर्थ्य वाढवणारी ताजी बातमी समोर येत आहे. एके २०३ ही एके ४७ चे अत्याधुनिक रुप असलेली रायफल भारतीय सैन्यातल्या जवानांना मिळणार आहे. यासंदर्भात भारत आणि रशिया दरम्यान करार झाला आहे. अशा साडे सात लाख २०३ एके ४७ बंदुकांची  ऑर्डर रशियन कंपनीला देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भारत आणि रशियाच्या संयुक्त उपक्रमात साधारण सात लाख असॉल्ट रायफल तयार होणार आहेत. अमेठीमध्ये याचा कारखाना असणार आहे. फिल्ड गन फॅक्टरी कानपूरमध्ये असणार आहे. एके-203 ही एके 47 ची थर्ड जनरेशन रायफल आहे. या रायफल 'मेक इन इंडिया' कार्यक्रमा अंतर्गत बनणार आहेत. यामध्ये ऑर्डिनंस फॅक्ट्री बोर्ड जवळ मेजॉरीटी शेअर 50.5 टक्के असणार आहेत तर रशियाकडे 49.5 टक्के शेअर्स असणार आहेत. 


आता दरवर्षी 75 हजार एके 203 रायफल बनवले जातील. हा ब्रम्होस प्रमाणे संयुक्त उपक्रम मॉडेल असणार आहे. इथे केवळ या रायफल बनवल्याच जाणार नाहीत तर निर्यात देखील केल्या जातील असे ओएफबीचे उप महानिदेशक गगन चतुर्वेदी यांनी सांगितले. 24 महिन्यात याचे स्वदेशीकरण केले जाणार आहे. 



एके 203 तंत्र एके 47 प्रमाणे आहे पण ही नवी रायफल एक 47 च्या तुलनेत अचूक निशाणा साधणार आहे. नव्या असॉल्ट रायफलमध्ये एके 47 प्रमाणे अॅटोमॅटीक आणि सेमी अॅटोमॅटीक दोन्ही यंत्रणा असणार आहेत. एकदा ट्रिगर ठेवल्यावर गोळ्या चालत राहतात. नव्या असॉल्ट रायफलची लांबी 3.25 फूट असेल. गोळ्यांनी भरलेल्या रायफलचे वजन 4 किलोग्रॅम असणार आहे. यामधून एका मिनिटाला 600 गोळ्या डागता येऊ शकतात. म्हणजेच एका सेकंदात दहा गोळ्या मारल्या जाऊ शकतात. यासाठी एके 203 चे गॅस चेंबर आणि स्रिंग आधीच सुधारीत ठेवण्यात आल्या आहेत. याची लक्ष्य साधण्याची क्षमता 400 मीटर पर्यंत असणार असून कोणता नवा सैनिकही यातून अचूक निशाणा साधू शकणार आहे.