मुंबई :  इंडियन बँकेने (Indian Bank) आपल्या खातेधारकांना आनंदाची बातमी दिली आहे. या सरकारी बँकेने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्याजदरात (Intrest Rate) मोठ्या प्रमाणात वाढ केलीय. FD वर चांगलं व्याज हवं असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. बँकेचे नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर (Fixed Deposit) लागू असणार आहे. या निर्णयाची अमंलबजावणी शनिवार 29 ऑक्टोबरपासून करण्यात आली आहे. बँकेने व्याजदरात 0.90 टक्क्यांनी वाढ केली आहे. (indian bank hike in fd intrest rate by 90 bps points account holders good news know how many intrest rate incresed)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरच व्याज दरानुसार पैसे मिळणार आहे, असल्याचं बँकेकडून सांगण्यात आले आहे. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर जास्त व्याज देत आहे. बँकेच्या या निर्णयाचा लाखो ग्राहकांना फायदा होणार आहे.


कालावधीनिहाय व्याज दर


7 दिवस ते 29 दिवसांच्या FD वर 2.80 टक्के व्याज.


30 ते 45 दिवसांच्या FD वर सामान्य 3.00 टक्के व्याज.


46 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 3.25 टक्के व्याज.


91 ते 120 दिवसांच्या FD वर 3.50 टक्के व्याज.


121 दिवस ते 180 दिवसांच्या FD वर 3.85 टक्के व्याज.


181 दिवस ते 9 महिन्यांच्या FD वर 4.50 टक्के व्याज.


9 महिने ते 1 वर्षासाठी FD वर 4.75 टक्के व्याज.


1 वर्षासाठी FD वर 6.10 टक्के व्याज.


1 वर्ष ते 2 वर्षांसाठी FD वर 6.30 टक्के व्याज.


2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्षांसाठी FD वर 6.50 टक्के व्याज.


3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे FD वर 6.40 टक्के व्याज.


5 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी FD वर 6.30 टक्के व्याज मिळेल.