Adani Group: अदानी प्रकरणावर RBI गव्हर्नर म्हणाले, `अशा प्रकरणांमुळे भारतीय बॅकिंग...`
indian banking system will not be affected by such cases rbi chief on adani case: आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी थेट अदानींचा उल्लेख न करता उत्तर दिलं.
indian banking system will not be affected by such cases rbi chief on adani case: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी अदानी ग्रुप प्रकरणावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. देशातील बँकिंग क्षेत्र एवढं मजबूत आणि भक्क आहे की त्यावर अशा प्रकरणांचा परिणाम होणार नाही, असा विश्वास दास यांनी व्यक्त केला. अदानी ग्रुपसंदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देताना आरबीआयने स्वत: यासंदर्भातील दखल घेत शुक्रवारी एक पत्रक जारी केलं होतं अशी आठवण दास यांनी करुन दिली. भारतीय बॅकिंग क्षेत्र सक्षम असल्याचं आरबीआयने म्हटलं आहे.
काय म्हणाले दास?
आरबीआयचे गव्हर्नर असलेल्या दास यांनी थेट अदानी ग्रुपचा उल्लेख न करता अप्रत्यक्षपणे या विषयावर भाष्य केलं. "आज भारतीय बँकांचा आवाका, त्यांची क्षमता फारच सक्षम आहे. त्यांची क्षमता इतकी आहे की अशा प्रकारच्या गोष्टींमुळे त्यावर परिणाम होणार नाही," असं दास म्हणाले.
बँकांना काही निर्देश दिले का?
सध्याच्या स्थितीमध्ये आरबीआय भारतामधील बँकांना अदानी ग्रुपला दिलेल्या कर्जांसंदर्भात काही निर्देश दिले आहेत का? असा प्रश्न दास यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना दास यांनी बँक कर्ज देताना संबंधित कंपनीची परिस्थिती आणि संबंधित योजनांसंदर्भातील कॅश फ्लोची स्थिती पाहून निर्णय घेतला जातो असं सांगितलं. कर्जाच्या बाबतीत कंपन्यांच्या देशांतर्गत किंवा देशाबाहेरील नोंदणीकरणाशी काही थेट संबंध नसतो असंही दास म्हणाले. बँकाची मूल्यांकन प्रक्रिया फार सुधारली आहे असंही दास म्हणाले. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एम. के. जैन यांनी भारतीय बँकांनी अदानी ग्रुपला दिलेलं कर्ज फार नाही. शेअर्सच्या मोबदल्यात जे कर्ज देण्यात आलं ते फार कमी आहे असंही जैन म्हणाले.
बँकांना केलं सक्षम
आरबीआय़ने मागील 3 ते 4 वर्षांमध्ये बँकांना अधिक सक्षम बनवण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. संचालन, ऑडिट समित्यांबरोबरच इतर नियंत्रक समित्यांबद्दल वेळोवेळी निर्देश बँकांना देण्यात आले आहेत असंही आरबीआयने वारंवार स्पष्ट केलं आहे.
रेपो रेट वाढवला
आरबीआयने आज रेपो दरांमध्ये 0.25 पॉइण्टने वाढ केली आहे. त्यामुळे गृहकर्जांबरोबरच इतर कर्जही महाग झाली आहेत. मागील 9 महिन्यांमध्ये 6 वेळा रेपो रेट वाढवण्यात आला आहे. मागील काही महिन्यांमध्ये गृहकर्जाचे हफ्ते 2.5 टक्क्यांनी वाढले आहेत.