नवी दिल्ली : आताची मुलं भारताचं भविष्य आहेत. पण हेच भारताचं भविष्य धोक्यात आलं आहे. कारण भारतीय मुलं लठ्ठ होत चालली आहेत. मुलांमधील लठ्ठपणाच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. जगात सर्वाधिक लठ्ठ मुलं चीनमध्ये आहेत. चीनमध्ये ८ कोटी ४० लाख मुलं लठ्ठ आहेत. अमेरिकेत ७ कोटी ५० लाख मुलं लठ्ठ आहेत. भारतातल्या मुलांमध्ये लठ्ठपणा चिंताजनक पद्धतीनं वाढतो आहे. लहानपणी मुलांना अतिप्रोटिनयुक्त आहार दिला जातो. गरज नसतानाही मुलाला जबरदस्तीनं जेवू घातलं जातं. पिझ्झा, बर्गर, चिप्स असे जंक फूड खाण्याचं वाढलेलं प्रमाण, मोबाईल आणि कंप्युटर गेममुळे मुलं एकाच जागी बसून राहू लागलीयत. मुलं खेळाच्या मैदानाकडे मुलांनी फिरवलेली पाठ लठ्ठपणासाठी कारणीभूत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पालकच मुलांना लठ्ठपणाकडे नेत असतात. त्यामुळं पालकांनीच मुलांच्या आहाराच्या नियोजनात काटेकोरपणा आणण्याचं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. मुलांचं वय आणि त्यांच्या शरिराची गरज पाहून त्यांचा आहार ठरवावा. जंक फूड शक्यतो टाळावेत. पालेभाज्या, अंडी, मांस यांचं संतुलित प्रमाण आहारात ठेवावं. मुलांना दिवसातून एकदा तासभर मैदानावर खेळण्यासाठी पाठवावं. 


मुलं तंदुरुस्त राहिली तर देशाचं भवितव्य उज्ज्वल राहिल. अन्यथा येत्या 20 वर्षात भारताची ओळख आजारी लोकांचा देश म्हणून होईल अशी भीती व्यक्त करण्यात येते आहे.