Nasa Report for 2100 : एका अमेरिकीत संस्थेने भारतातील काही ठिकाणांबाबत धक्कादायक भाकीत केलं आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या (NASA) एका अहवालात दावा करण्यात आला आहे की आजपासून 78 वर्षांनंतर म्हणजेच 2100 पर्यंत भारतातील 12 शहरे अनेक पाण्यात बुडतील. या अहवालानुसार केवळ किनारपट्टीवरच नव्हे तर मैदानी भागातही प्रचंड विध्वंस होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IPCC चा भयानक अहवाल


नासाने (NASA) सी लेव्हल प्रोजेक्शन टूल (Sea Level Projection Tool) तयार केले आहे. जेणेकरून वेळीच समुद्रकिनाऱ्यांवर येणाऱ्या आपत्तीपासून लोकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करता येईल. या ऑनलाइन टूलद्वारे भविष्यातील आपत्तीची स्थिती म्हणजेच समुद्राची वाढती पातळी (Sea Level) जाणून घेता येणार आहे. संस्थेच्या इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) च्या अहवालाचा हवाला देत, अनेक शहरे समुद्रात बुडण्याच्या इशाऱ्याचा पुनरुच्चार केला आहे. IPCC चा हा मागील मूल्यांकन अहवाल जगातील सर्व देशांची हवामान प्रणाली आणि हवामान बदलाची परिस्थिती याबाबत अधिक चांगल्या प्रकारे मूल्यांकन करतो.


इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज संस्था (IPCC) 1988 पासून जागतिक स्तरावर हवामान बदलाचे मूल्यांकन करत आहे. आयपीसीसी दर 5 ते 7 वर्षांनी जगातील पर्यावरणाच्या स्थितीचा अहवाल देते. यावेळचा अहवाल अत्यंत भयावह असल्याचे सांगण्यात येत आहे.


ही भारतीय शहरे होणार गायब!


अहवालानुसार, 78 वर्षांच्या आत म्हणजेच 2100 पर्यंत, समुद्राची पातळी वाढल्यामुळे भारतातील 12 किनारी शहरे 3 फूट पाण्याखाली जातील. म्हणजेच ओखा, मुरगाव, कांडला, भावनगर, मुंबई, मंगळुरू, चेन्नई, तुतीकोरण आणि कोची, पारादीपचा किनारी भाग पाण्याखाली जातील. त्यामुळे किनारी भागात राहणाऱ्या लोकांना जीव वाचवण्यासाठी सुरक्षित स्थळी जावं लागणार आहे.


या संस्थेचे प्रमुख बिल नेल्सन म्हणाले की, "सी लेव्हल प्रोजेक्शन टूल जगाला सांगण्यासाठी पुरेसे आहे की पुढच्या शतकापर्यंत आपले बऱ्याच देशांच्या जमिनीचे क्षेत्रफळ कमी होतील. समुद्र किनाऱ्यावरील शहरांना आपल्या लाटेत गिळंकृत करेल. त्याचे खोल परिणाम भारतासह आशिया खंडावरही दिसून येतील."