मुंबई : भारतीय सीमेत घुसखोरी (Indian Territory) करणारे पाकिस्तानचे (Pakistani) एक जहाज तटरक्षक दलाने पकडले आहे. या जहाजावरील 12 जणांना ताब्यात घेतले गेले आहे. भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) ही मोठी कारवाई केली आहे. गुजरातच्या (Gujarat) ओखाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय तटरक्षक दलाने बुधवारी सांगितले की, त्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करणारी पाकिस्तानी जहाज पकडले. या बोटीवर 12 जण होते जे पाकिस्तानकडून आले होते. गुजरात सीमेजवळ घुसखोरांचा मागोवा घेणाऱ्या 'राजत्न' या भारतीय जहाजाने पाळत ठेवण्याच्या मोहिमेदरम्यान पाकिस्तानी जहाज अल्लाह पावावाकलचा शोध घेतला. भारतीय सीमेत पाकिस्तानी जहाजावर 12 लोक उपस्थित होते. तटरक्षक दलाच्या जवानांनी तत्काळ जहाज ताब्यात घेतले.


मंगळवारी रात्री हे जहाज गस्त घालण्याच्या मोहिमेदरम्यान पकडले गेले. विशेष गोष्ट म्हणजे खराब हवामान असूनही हे पाकिस्तानी जहाज रत्नाकरच्या नजरेतून सुटू शकले नाही. तटरक्षक दलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 14 सप्टेंबरच्या रात्री भारतीय तटरक्षक दलाचे जहाज राजरत्न गस्त घालण्याच्या मोहिमेदरम्यान पाकिस्तानी जहाजाचा शोध घेतला. 



अल्लाह पाववकाल नावाच्या या जहाजावर 12 क्रू मेंबर्स होते. हे जहाज गुजरातच्या द्वारका जिल्ह्यातील ओखा येथे आणण्यात आले. पुढील तपास केला जात आहे. आणखी एका घटनेत, आयसीजीने 13 सप्टेंबरच्या रात्री दीवमधील वनकबारा येथे बुडलेल्या बोटीतून सात मच्छिमारांची सुटका केली.