मुंबई : कोरोनानंतर देशातील देशांतर्गत बाजारपेठ उघडल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय आयटी सेवा क्षेत्रात नोकरीच्या संधी येऊ लागल्या आहेत. एका नवीन अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2022 च्या उत्तरार्धात सुमारे 4.5 लाख नवीन नोकर्‍या येण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्केट इंटेलिजन्स फर्म UnearthInsight च्या मते, IT सेवा क्षेत्राची FY22 च्या दुसऱ्या सहामाहीत सुमारे 17-19 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. ज्यामुळे IT सेवा उद्योगात 1.75 लाख निव्वळ कर्मचार्‍यांची वाढ होईल.


IT सेक्टरमध्ये नोकऱ्या वाढणार
UnearthInsight चे संस्थापक आणि CEO गौरव वासू म्हणाले, "आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये पहिल्या सहामाहीच्या तुलनेत वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत 12 टक्क्यांहून अधिक कर्मचारी भरती होण्याची अपेक्षा आहे."


अहवालानुसार, 2022 या आर्थिक वर्षात भारतीय IT सेवा क्षेत्राच्या महसुलात 16-18 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.


देशांतर्गत आणि बहुराष्ट्रीय अशा 30 हून अधिक आयटी सेवा कंपन्या आर्थिक वर्षात 2,50,000 हून अधिक फ्रेशर्सला जॉबच्या संधी देतील अशी अपेक्षा आहे.


IT सेवा क्षेत्रातील दिग्गजांमधील जागतिक क्लाउड सेवा मागणी स्पर्धेमुळे 2030 पर्यंत IT सेवा उद्योगासाठी क्लाउड सेवा महसूल $80-100 अब्ज इतका अपेक्षित आहे, असाही अहवालाचा अंदाज आहे.


अहवालानुसार, सॉफ्टवेअर उत्पादन आणि प्लॅटफॉर्म व्यवसाय 2030 पर्यंत 15 अब्ज ते 20 अब्ज डॉलर्सची कमाई करेल.