भारतीय भाषांमुळे वाढणार इंटरनेट युजर - आयएएमएआय
इंटरनेटवर इंडिकचा वापर ठरवण्यामध्ये वय हा लक्षणीय घटक असल्याचे निष्कर्षांतून दिसून येते. शहरी भारतातील 45 वर्षे वयावरील अंदाजे 75% युजर व ग्रामीण भारतातील 45 वर्षे वयावरील अंदाजे 85% युजर इंडिकमध्ये इंटरनेट वापरतात.
मुंबई : इंटरनेटवर इंडिकचा वापर ठरवण्यामध्ये वय हा लक्षणीय घटक असल्याचे निष्कर्षांतून दिसून येते. शहरी भारतातील 45 वर्षे वयावरील अंदाजे 75% युजर व ग्रामीण भारतातील 45 वर्षे वयावरील अंदाजे 85% युजर इंडिकमध्ये इंटरनेट वापरतात.
शहरी भारतात इंडिकचा वापर कटाक्षाने मनोरंजनाच्या म्युझिक/व्हिडिओ स्ट्रीमिंग न्यूज व अन्य स्वरूपातील मनोरंजन अशा विविध स्वरूपांमध्ये मर्यादित आहे. सरासरी, इंडिकमधील इंटरनेटच्या एकूण वापरापैकी 70% वापर असा उपक्रमांसाठी मर्यादित आहे. तुलना करता, ऑनलाइन बँकिंग, नोकरीचा शोध किंवा तिकीट बुकिंग (जी भारतातील सर्वात लोकप्रिय ई-कॉमर्स सुविधा आहे) अशा महत्त्वाच्या सेवांच्या बाबतीत अजूनही लोकल कंटेंटचा वापर कमी होत असल्याचे दिसते (20% हून कमी). इंटरनेट युजरसाठी सर्रासपणे पहिला वापर असलेला सर्च इंजिनचा वापरही इंडिकमध्ये केवळ 39% केला जातो.
आयएएमएआयच्या मते, यातून इंडिकमधील अशा महत्त्वाच्या इंटरनेट सेवांना असलेल्या मर्यादा लक्षात येतात व त्यामुळे ग्रामीण भारतात व आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गात इंटरनेटचा प्रसार होण्यावर निर्बंध येतात.
इंडिकमधील इंटरनेट 23% इंटरनेट नॉन-युजरना डिजिटल होण्यासाठी महत्त्वाचा प्रेरक घटक आहे, असेही अहवालात नमूद केले आहे. म्हणजेच, भारतात इंडिकमधील इंटरनेट कंटेंटचा प्रसार केल्यास अंदाजे 205 दशलक्ष नवे इंटरनेट युजर वाढू शकतात. आयएएमएआयने अधोरेखित केले आहे की, इंटरनेट इन इंडिक केवळ इंडिकमधील कंटेंटपुरता मर्यादित नसून, तो संपूर्ण डिजिटल इकोसिस्टीमसाठी लागू होतो. भविष्यात, संपूर्ण डिजिटल इंटरफेस युजरसाठी सोयीचा करण्याच्या दृष्टीने यूआरएल, डोमेन नेम्स, की टॅग्स, इंडेक्सिंग यांना इंडिकमध्ये प्राधान्य देणे गरजेचे आहे
जगभर, चीनने इंटरनेट कंटेंटसाठी मँडरिन लिपीचा वापर करून इंटरनेट युजरची सर्वाधिक संख्या नोंदवली आहे. ही संख्या इतकी आहे की इंटरनेटवर चायनिज ही इंग्रजीनंतरची दुसऱ्या क्रमांकांच सर्वात लोकप्रिय भाषा आहे. याउलट, जगभरातील इंटरनेट कंटेंटमध्ये इंडिक कंटेंटचे प्रमाण जेमतेम 0.1% आहे. आयएएमएआयने म्हटले आहे की, डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी इंडिकमध्ये अधिकाधिक इंटरनेट सेवा देईल, इंटरनेटचा वापर करण्याचे प्रमाण वाढवेल व भारतातील सामाजिक-आर्थिक बाबतीत कमकुवत असलेल्या वर्गाला खऱ्या अर्थाने सक्षम करेल अशी इंडिक इंटरनेट सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे.
आयएएमएआयविषयी
इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया [आयएएमएआय] ही भारतातील संपूर्ण डिजिटल व्यवसायाचे प्रतिनिधित्व करण्याची महत्त्वाकांक्षा असलेली नवी व उत्तम संघटना आहे. आघाडीच्या ऑनलाइन प्रकाशकांनी 2004 मध्ये संघटनेची स्थापना केली. गेल्या 13 वर्षांत संघटनेने ऑनलाइन पब्लिशिंग, मोबाइल जाहिरात, ऑनलिन जाहिरात, ई-कॉमर्स, मोबाइल कंटेंट व सेवा, मोबाइल व डिजिटल पेमेंट्स अशा डिजिटल व ऑनलाइन उद्योगातील आणि फिन-टेक, एज्यु-टेक व हेल्थ-टेक अशा उदयोन्मुख क्षेत्रांतील आव्हानांवर प्रभावीपणे तोडगा काढला आहे.