Indian Navy Recruitment: भारतीय नौदलाने Tradesman mate च्या पदांसाठी सध्या रिक्त जागा उपलब्ध आहेत. या रिक्त पदांद्वारे एकूण 112 पदांची भरती केली जाणार आहे. नौदलाने जाहीर केलेल्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असूनऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. त्यामुळे नव्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Tradesman mate च्या पदांवर जाहीर झालेल्या या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया आजपासून (06 ऑगस्ट 2022) प्रक्रिया सुरू झाली आहे. या अर्जाची शेवटची तारिख 06 सप्टेंबर 2022 पर्यंत राहील. या परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. अशा वेळी उमेदवारांनी रिक्त जागांचा संपूर्ण तपशील पाहणे आवश्यक आहे. 


ऑनलाइन अर्ज कसा करावा? 
- उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट- joinindiannavy.gov.in ला भेट द्यावी.
- new recruitment च्या लिंकवर क्लिक करा.
- A&N Tradesman Mate च्या ऑनलाइन फॉर्म 2022 च्या पर्यायावर जा, जेथे 112 पोस्ट उपलब्ध असतील. 
- Apply Online च्या लिंकवर क्लिक करा, त्यावर आवश्यक तपशील भरून नोंदणी करा.
- नोंदणी केल्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता.
- अर्ज पूर्ण केल्यानंतर एक प्रिंट आउट घ्या.
- थेट लिंकद्वारे अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. 


Tradesman mate: पात्रता आणि वय
या रिक्त पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाचे किंवा संस्थेचे कोणतेही 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त संस्थेतून ITI असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 25 वर्षांपेक्षा कमी असावे. वयाची गणना 06 सप्टेंबर 2022 च्या आधारे केली जाईल.