Indian Navy Recruitment 2021: 12वी पास असाल तर नेव्हीमध्ये भर्ती होण्याची सुवर्ण संधी, लगेच करा अप्लाय
जर तुम्ही १२ वी पास असाल आणि चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी भारतीय नैदलात चांगली संधी आहे.
मुंबई : जर तुम्ही १२ वी पास असाल आणि चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी भारतीय नैदलात चांगली संधी आहे. आर्टिफिशल अप्रेंटिस (AA) आणि Senior Secondary Recruiters (SSR) पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया भारतीय नौदलाकडून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. भारतीय नैदलामध्ये या भरतीअंतर्गत एकूण 2500 पदे भरते जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख (last date to apply) मे 2021 आहे.
या पदांवर भरती
आर्टिफिशल अप्रेंटिस (AA) - 500
Senior Secondary Recruiters (SSR) - 2000
शिक्षणाची पात्रता
आर्टिफिशल अप्रेंटिस (AA): उमेदवार गणित, फिझीक्स आणि केमिस्ट्री / बायोलॉजी / कॉम्प्यूटर सायन्स या विषयांमधून १२ वी मध्ये 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण असावे.
Senior Secondary Recruiters (SSR): उमेदवारांनी 12 वी मध्ये गणित, फिझीक्स किंवा पुढीलपैकी एक विषय रसायनशास्त्र / जीवशास्त्र / कॉम्प्यूटर सायन्स मधून उत्तीर्ण असावे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा जन्म,1 फेब्रुवारी 2001 ते 31 जुलै 2004 दरम्यान असावा
निवड प्रक्रिया
सुमारे 10 हजार उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी होईल. बारावीच्या निकालानुसार लेखी परीक्षा आणि PET साठी उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग करण्यात येईल.
प्रत्येक राज्याचा कट ऑफ वेगळा असू शकतो, कारण रिक्त जागा या प्रत्येक राज्यांसाठी वेगळा आहे.