मुंबई : भारतीय नौदलाने सेलर पदांच्या भरतीसाठी नोटीफिकेशन जारी केले आहे. सर्व अविवाहित आणि योग्य उमेदवारांना Indian Navy MR recruitment 2021 साठी अधिकृत वेबसाइटवर (joinindiannavy.gov.in)च्या माध्यमातून 29 ऑक्टोबर 2021 पासून अर्ज करता येणार आहे. या पदांच्या भरतीसाटी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2021 आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रक्रियेच्या माध्यमातून भारतीय नौसेनेत सेलर आणि एकूण 300 रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.  या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना ट्रेनिंग दरम्यान 14600 रुपयांपर्यंतचा स्टापेंड दिला जाणार आहे. तसेच ट्रेनिंग नंतर उमेदवारांना 21700 रुपयांपासून ते 69700 रुपयांपर्यंत दरमहा वेतन दिले जाणार आहे.


अधिकृत नोटीफिकेशनुसार, या पदांच्या भरतीसाटी उमेदवारांनी 10 वी पास असणे गरजेचे आहे. याशिवाय उमेदवाराच जन्म 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2005 च्या दरम्यान असायला हवा.


निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि फिजिकल फिटनेस टेस्ट (PFT)च्या आधारावर केले जाणार आहे. लेखी परीक्षेत विज्ञान, गणित आणि सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्न असतील. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्याच दिवशी फिजिकल टेस्ट देखील द्यावी लागेल. संबधित पदांच्या भरतीसाठी अधिकृत वेबसाइटवरील नोटीफिकेशन तपासू शकता.