पुरातून जीव वाचवून गर्भवती महिला छतावर आली, पण तिला प्रसव वेदना सुरू झाल्या...
केरळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे सर्व सामान्यांचं जीवन विस्कळीत झालं आहे. अनेकांना यात प्राण गमवावा लागला आहे.
कोच्ची : केरळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे सर्व सामान्यांचं जीवन विस्कळीत झालं आहे. अनेकांना यात प्राण गमवावा लागला आहे. एक थरारक घटना केरळात घडलीय. अलुवाजवळ चेंगमांदमध्ये गर्भवती महिला सजिता जाबिल आपल्या घराच्या छतावर मदतीची वाट पाहत होती. अडचणी तेव्हा वाढल्या जेव्हा सजिताला प्रसव वेदना वाढली. तेव्हा त्यांना वाटायला लागलं होतं की, आता आपला आणि आपला पोटातील बाळाचा जीव वाचवणारं कुणीही नाही.
इंडियन नेव्ही हेलिकॉप्टरघेऊन बचावाला
अशात इंडियन नेव्हीचे जवान हेलिकॉप्टरसह तसेच एका डॉक्टरसोबत त्यांच्या बचावाला पोहचलं. यानंतर त्यांना हेलिकॉप्टरने वेळेवर कोच्चीला पोहोचायचं होतं. कोच्चीच्या आयएनएचएस संजीवनी हॉस्पिटलमध्ये सजिताने एका मुलाला जन्म दिला. जर नेव्ही वेळेवर पोहोचली नसती, तर स्थिती आणखी गंभीर झाली असती. आता आई आणि बाळाची तब्येत सामान्य आहे.
३० मिनिटं हेलिकॉप्टर हवेत स्थिर ठेवलं
या सफल ऑपरेशननंतर नेवल कमांडर विजय शर्मा जे, या हेलिकॉप्टरचे पायलट होते, त्यांचं कौतुक होत आहे. विजय शर्मा यांनी ३० मिनिटं हेलिकॉप्टर स्थिर ठेवलं कारण सजिता यांना कोणताही धक्का न लागता वर आणता येईल. १७ ऑगस्टच्या मदत कार्यात देखील त्यांनी २ महिलांचा जीव वाचवला होता.
त्या घराच्या छतावर लिहिलं 'थँक्स'
गर्भवती महिलेचा आणि त्या पोटातील बाळाचा जीव वाचवल्याने, ज्या घरावरून या महिलेला हेलिकॉप्टरने मृत्यूच्या दाढेतून सोडवण्यात आलं, त्या घराच्या छतावर थँक्स लिहून इंडियन नेव्हीचे आभार मानण्यात आले आहेत. केरळमध्ये इंडियन नेव्हीने केलेली मदत निश्चितच कौतुकास्पद आहे. संपूर्ण देश केरळच्या दु:खात सहभागी आहे, देशातून केरळला मोठ्या प्रमाणात मदत मिळतेय.