नवी दिल्ली :  भारतीय नौदलाने सेक्स चेंज केल्यामुळे मनीष गिरी नावाच्या नाविकाला कामावरून काढले. नौदलाने त्याला नौदल नियम आणि भर्ती नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दोषी ठरविण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नौदलाचा नाविक मनीष गिरी याने सुट्टी घेऊन मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात आपले सेक्स चेंज केले. सेवेची त्याला गरज नाही यामुळे त्याच्यावर कारवाई करत त्याला कामावरून काढले. 


नौदलाने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले की, मनीष गिरी याने नोकरीसाठी भर्ती नियम आणि पात्रता अटींचे उल्लंघन केले आहे. सध्याच्या नियमानुसार लिंग परिवर्तन केल्यास नोकरीत ठेवले जात नाही. 


मनीष याची नियुक्ती विशाखापट्टणम येथे होती. तो सुट्टीवरून परत आल्यावर त्याने आपले केस वाढविले होते आणि साडी परिधान करायला लागला होता. नौदलाकडे हे प्रकरण गेले तेव्हा त्यांनी हे प्रकरण संरक्षण मंत्रालयाकडे पाठविले. त्यानंतर त्याला नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 


७ वर्षापूर्वी नौदलात दाखल झालेल्या मनीषला पेन्शन मिळाणार नाही. त्याला १५ वर्ष सेवा पूर्ण केल्यास त्याला पेन्शन मिळाले असते. नौदलात नाविक पदासाठी केवळ पुरूषांची नियुक्ती करण्यात येते.