नवी दिल्ली - पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये रोज होणारे चढ-उतार आता नित्याचेच झाले आहेत. तरीही इंधनाची मागणी रोजच्या रोज वाढतेच आहे. जर तुम्हाला कोणी पेट्रोल पंप सुरू करण्याची संधी दिली तर... वाचून थोडे आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे. सरकारी नियंत्रणाखालील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लवकरच देशभरात पेट्रोल पंपांची डिलरशीप देणार आहे. त्यासाठी सध्या इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इंडियन ऑईल देशभरात २७ हजार नवे पेट्रोल पंप सुरू करणार आहे. त्यामुळे यामध्ये संधी मिळाल्यास तुम्हीही या सरकारी कंपनीसोबत राहून स्वतःची प्रगती साधू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नियम काय आहेत?
पेट्रोल पंप चालवण्यातून नफा मिळत असला, तरी याची डिलरशीप मिळण्याची प्रक्रिया अत्यंत जटील आहे. इंडियन ऑईलची डिलरशीप मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज  www.petrolpumpdealerchayan.in या  वेबसाईटवर भरून पाठवावे लागणार आहेत. याच वेबसाईवर डिलरशीप संदर्भातील सर्व नियमांची माहिती देण्यात आली आहे. 


डिलरशीप मिळवणे झाले सोप्पे
डिलरशीप मिळवण्यासाठी विविध नियम आहेत. यावेळी पूर्वीच्या अनेक नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. जर तुमच्याकडे डिलरशीपसाठी लागणारे पैसे आत्ता नसतील, तरीही तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी लागणारी जमीनही आत्ता तुमच्याकडे नसेल, तरीही तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता. मात्र, जर तुम्हाला डिलरशीप मिळाली, तर तुमच्याकडे असलेली जमीन दाखवावी लागेल. तसेच डिलरशीप मिळाल्यावरही तुम्हाला स्वतःकडील निधी दाखवावा लागेल.


अर्ज करण्यासाठी काय हवे?
अर्जदार भारतीय नागरिक हवा
अर्जदाराचे वय २१ ते ६० या दरम्यान हवे
कमीत कमी दहावीपर्यंत शिक्षण हवे
निवड झाल्यावर तुम्हाला कागदपत्रे जमा करावी लागतील
अर्जदाराच्या अकाऊंटमध्ये २५ लाख असण्याचीही गरज नाही
सध्या जमीन नसेल, तरी अर्ज करू शकता. 


इंडियन ऑईलकडून सर्वाधिक पेट्रोल पंप उत्तर प्रदेशात उघडण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच कंपनीने ५५,६४९ रिटेल आऊटलेटसाठी अर्ज मागवले होते. आता इंडियन ऑईल २७ हजार पेट्रोल पंप डिलरशीप देत आहे. या शिवाय हिंदूस्थान पेट्रोलियम १२,८६५, भारत पेट्रोलियम १५,८०२ डिलरशीप देणार आहे.