मुंबई : इंडियन ओव्हरसीज बँकने (Indian Overseas Bank) 21 ते 38 वयवर्गातील तरुण वर्गाच्या बँकिंगच्या गरजा लक्षात ठेवून 'आयओबी ट्रेंडी' बचत खाते (IOB Trendy Bank account) आणले आहे. या खात्यासोबत ऑनलाइन अर्ज सुविधा, तिमाहीत सरासरी 1 लाख रुपये बॅलन्स मेंटेन करण्याऱ्या खातेधारकांना मृत्यूपश्चात 5 लाखांचे अपघाती विमा कवच असणार आहे. (Indian Overseas Bank launches ‘IOB Trendy’ savings account for youth)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 तसेच तरुणांसाठी बँकेने चेकही मोफत देण्याची सुविधा केली आहे. यात कमाल 50 चेकची मर्यादा असलेले मोफत चेकबूक असणार आहे. तसेच मोफत पैसे पाठवण्याची सुविधा (NEFT/RTGS/IMPS), डेबिट-क्रेडिटचे मोफत एसएमस अलर्ट, ECH/NACH मँडेटची मोफत नोंदणी करता येणार आहे.


आयओबीने (IOB) स्टँडिंग इन्स्ट्रक्शनची मोफत नोंदणी, महिन्याला नोंदणी केलेल्या इ-मेलवर खात्याचे स्टेटमेंट, ऑटो स्वीप सुविधा, मोबाइल-इंटरनेट बँकिंग, व्हिडिओ केवायसी, ऑनलाइन खाते उघडण्याची सुविधा, इत्यादी सेवा-सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.