नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षातल्या कामावर जनता एकदम खुश असल्याचा आणखी एक पुरावा प्रसिद्ध झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगप्रसिद्ध फॉब्स मासिकानं प्रसिद्ध केलेल्या जगातल्या सर्वात विश्वासार्ह सरकारांमध्ये मोदी सरकारनं अव्वल नंबर मिळवला आहे. 


फोर्ब्सनं ऑगर्नायझेशन फोर इकॉनोमिक ओपरेशन म्हणजे ओईसीडीच्या हवाल्यानं १५ देशांची यादी प्रसिद्ध केलीय. त्यानुसार 73 टक्के भारतीय जनतेच्या मते मोदी सर्वात विश्वासार्ह सरकार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 


रँकिंगमध्ये कॅनडा दुसऱ्या तर तुर्कस्थान आणि रशियाचा तिसरा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियाचे सरकार सातव्या तर ब्रिटनच सरकार आठव्या स्थानी आहे. अमेरिकेच्या ट्रम्प सरकार  विश्वासार्हतेच्या बाबतीत दहाव्या स्थानी आहे.


दुसरीकडे मात्र शेतकरी मंडळी नरेंद्र मोदी सरकारवर नाराज असल्याचं चित्र आहे. फळपिकांसह अनेक पिकांचे भाव गडगडल्याने ही नाराजी सरकारवर असल्याचं बोललं जात आहे.