मिश्या हव्या अशा! भारतीय जनतेमध्ये वैमानिक आभिनंदन यांच्या मिश्यांचा ट्रेन्ड
भारतीय वैमानिक अभिनंदन यांच्या कर्तुत्वाचे जगभरातून कौतुक होत असताना त्यांच्या रूबाबदार मिश्या पुरूषांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.
मुंबई : सोशल मीडियावर एकादी नवीन गोष्ट क्षणार्धात वाऱ्यासारखी व्हायरल होते. भारतीय वैमानिक अभिनंदन यांच्या कर्तुत्वाचे जगभरातून कौतुक होत असताना त्यांच्या रूबाबदार मिश्या पुरूषांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. 'पेट्टा' सिनेमात मेगास्टार रजनीकांत आणि 'सिंघम' सिनेमात सूर्याच्या मिश्या पुरूषांच्या आवडीस उतरल्या होत्या. त्यानंतर तरुणांमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड स्टार रणवीर सिंग यांची हेअर स्टाईल आणि दाढीचे क्रेझ वाढत असताना आता अभिनंदन स्टाईल तरूणांना वेड लावणार आहे.
रणवीर चे हेअर स्टायलिस्ट आणि 'द शेव बार्बरशॉप'चे मालक दर्शन येवालेकर यांनी सांगितल्याप्रमाणे 'भारतीय वैमानिक अभिनंदन यांची हेअर स्टाईल आणि मिश्या लवकरच अभिनंदन स्टाईल म्हणून ओळखीस येतील.'
भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले. हे मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले होते. शूक्रवारी रात्री ९ वाजता भारतीय वैमानिक अभिनंदन भारतात दाखल झाले.
ते सुखरूप भारतात पोहचल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. वायुसेना कर्मचारी त्याच्या मिश्या आणि दाढी शैलीसाठी ओळखले जातात आणि ते त्यांच्या उप-संस्कृतीचा एक भाग आहे. सोशल मीडियावर अभिनंदन यांच्या मिश्यांचे मीम्स व्हायरल होत असून यूजर्स च्या प्रतिक्रियांनी जोर धरला आहे.