मुंबई : जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आणि तुम्ही सरकारी नोकरीच्या (Government job) शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली बातमी आहे. इंडिया पोस्ट छत्तीसगड येथे डाक सेवक किंवा ब्रांच पोस्ट मॅनेजर (Branch Post Manager) आणि असिस्टेंट ब्रांच पोस्ट मॅनेजरच्या (Assistant Branch Post Manager) या  पदांसाठी 1137 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात (apply online). महत्त्वाचं म्हणजे भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेलली जाणात नाही. शॉर्टलीस्टेड उमेदवारांना थेट कागदपत्र पडताळणी आणि ट्रेनिंगसाठी बोलावले जाईल. ईच्छूक उमेदवारांनी संपूर्ण सूचना वाचल्यानंतरच अर्ज करा.


या तारखा लक्षात ठेवा
ऑनलाइन अर्ज सुरु होणारी तारीख - 08-03-2021
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 07-04-2021
अर्ज फी जमा करण्याची अंतिम तारीख - 07-04-2021


या पदांसाठी होणार भरती
1. ब्रांच पोस्ट मास्टर (बीपीएम)
2. सहाय्यक ब्रांच पोस्ट मास्टर (एबीपीएम)
3. ग्रामीण डाक सेवक (जीडीएस)


शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारने किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. यासह त्याला सायकल देखील चालवता आली पाहिजे.
जर कोणाला दुचाकी चालवता येत असेल तर तो सायकल चालवत असल्याचे समजले जाईल.


वयोमर्यादा
उमेदवारचे वय 18 से 40 वर्ष असावे.


अर्जाची फी  १०० रुपये
ST-SC आणि दिव्यांगसाठी अर्ज फी नाही.


वेतन
BPM पदासाठी 12000 रुपये (4 तासांच्या शिफ्टसाठी)
ABPM आणि डाक सेवक यांना 10000 रुपये (4 तासांच्या शिफ्टसाठी)


अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा. https://indiapostgdsonline.in/gdsonlinec3p6/Registration_A.aspx