नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणूक जवळ येत असताना राजकीय घडामोडी वाढल्या आहेत, राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी एक सहमती बनवण्यासाठी भाजप सतत इतर पक्षांशी चर्चा करत आहे, बैठक घेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दरम्यान सपाचे संस्थापक आणि  नेते मुलायम सिंह यादव यांनी एक मोठी घोषणा केली आहे, मुलायम सिंह यांनी म्हटलं आहे की, ते एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहेत. मात्र त्यांनी एक अट ठेवली आहे.


एका अटीवर मुलायम सिंह यांचा पाठिंबा


राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ या वर्षी जुलै महिन्यात संपणार आहे, यासाठी १७ जुलै रोजी राष्ट्रपती निवडणूक पार पडणार आहे. मीडियात येत असलेल्या बातम्यांनुसार भाजप यासाठी सर्व पक्षांच्या संपर्कात आहे.


दुसरीकडे मुलायमसिंह यांनी घोषणा केली आहे की, राष्ट्रपती निवडणुकीसाठी ते एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे. मात्र मुलायमसिंह यांनी असं म्हटलं आहे की, हा उमेदवार सर्वांना मान्य असणारा आणि कट्टर भगवा चेहरा असणारा नसावा.