Indian railway Latest News : रेल्वे मंत्रालयातील विविध विभाग विविध कारणांनी कार्यरत असतात. रेल्वेच्या नावाखाली सुरु असणाऱ्या या कोट्यवधींच्या उलाढालीमध्ये अनेक यंत्रणां आणि जबाबदार अधिकाऱ्यांचाही समावेश असतो, ज्याचं अनेकांनाच कुतूहल वाटतं. पण, इतकं सर्व असतानाच एक असा प्रकार घडला आहे, ज्यामुळं यंत्रणाही हादरल्या आहेत. कारण रेल्वे विभागाला कोट्यवधींचा गंडा घालण्यात आला आहे. बरं, ही फसवणूक करणाऱ्या व्यक्तींची ओळख तुम्हालाही हादरवून सोडणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार रेल्वे मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाची 31 कोटी 50 लाख रुपयांची रक्कम बळकावल्याप्रकरणी सीबीआयकडून पाच जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. 


अटक करण्यात आलेल्यांमध्ये रेल्वे विकास प्राधिकरणाचा माजी व्यवस्थापक, दिल्लीतील मध्यस्त व्यक्ती गोपाल ठाकूर, मुंबईस्थित हितेश करेलिया, निलेश भट, बँक ऑफ बडोदाचा माजी शाखा व्यवस्थापक जयवंत राय यांचा समावेश आहे. अटकेची कारवाई करण्यात आलेल्या या पाचही जणांना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 


सीबीआयचं धाडसत्र 


रेल्वेच्या मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या विभागात झालेल्या अफरातफरीसंदर्भात सोमवारी मुंबई, गोवा आणि हिमाचल प्रदेशातील जवळपास 12 ठिकाणी CBI नं धाडी टाकल्या. त्याचवेळी रेल्वेच्या जमीन विकास प्राधिकरणानं दिल्लीतील बँक ऑफ बडोदामध्ये 35 कोटी रुपये FD मध्ये ठेवले होते अशी बाब समोर आली. 


पहिल्या वर्षाचा कालावधी संपताच आणखी तीन महिन्यांसाठी ही रक्कम (योजना) Renew करण्याचा निर्णय घेण्यात आला. इथंच सध्या अटकेत असणाऱ्या पाचजणांनी कुरापती करत तब्बल 31 कोटी 50 लाख रुपये काढत अवघे 3 कोटी रुपये पुढील तीन महिन्यांसाठी गुंतवले. या गैर व्यवहारासाठी मुंबईत काही बनावट कंपन्या स्थानप करण्यात आल्या आणि तिथंच पैसे जमा करत आरोपींनी ते रोख स्वरुपात आपापसांत वाटून घेतल्याची गंभीर बाब समोर आली. 


हेसुद्धा वाचा : 'रो-रो'तील प्रवाशानं समुद्रात मारली उडी; बोटीवर एकच खळबळ 


 


सध्याच्या घडीला रेल्वे विभागाच्या ठेवीतील रक्कम लांबवणारे पोलिसांच्या ताब्यात असून, आता त्यांच्यावर पुढे कोणती कायदेशीर कारवाई केली जाणर हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.