ऐन सणासुदीत रेल्वेने बदलले आरक्षणाचे नियम, तिकीट काढण्यापुर्वी तुम्हाला हे माहिती असायला हवं!
Indian Railway New Rules: भारतीय रेल्वेने आपल्या रेल्वे तिकीट बुकींगच्या नियमात अत्यंत महत्वाचा बदल केला आहे.
Indian Railway New Rules: देशातील कोट्यवधी रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातम आहे. भारतीय रेल्वेने आपल्या रेल्वे तिकीट बुकींगच्या नियमात अत्यंत महत्वाचा बदल केला आहे. आता 120 दिवासांऐवजी 60 दिवस आधी तुम्ही तिकिट बुकींग करु शकता. रेल्वे मंत्रालयाने नुकतेच यासंदर्भात नोटिफिकेशन काढले आहे. त्यानुसार अॅडव्हान्स रिझर्व्हेशनचा कालावधी कमी करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना अॅडव्हान तिकीट बुक करण्यासाठी खूप कमी वेळ मिळेल. रेल्वेने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, 1 नोव्हेंबर 2024 पासून ट्रेनच्या तिकीट रिझर्व्हेशनसाठी आता 120 दिवसांचा कालावधी नसेल. त्याऐवजी तुम्हाला 60 दिवस आधीच तिकीट रिझर्व्हेशन करता येणार आहे. 120 दिवसांच्या एआरपी अंतर्गत 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत केलेली बुकींग कायम राहणार आहे. नवा नियम नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या बुकींगवर असेल.
ताज सारख्या ट्रेनवर नियम लागू नसेल
ताज सारख्या काही दिवसांच्या कालावधीने चालणाऱ्या ट्रेनसाठी हा नियम नसेल. त्यांच्या रिझर्व्हेशनच्या नियमात कोणता बदल होणार नाही. ताज एक्सप्रेस, गोमती एक्सप्रेस सारख्या तात्काळ आरक्षणासाठी वेळ कमी असतो. तसेच विदेशी पर्यटकांसाठी 365 दिवसांच्या कालावधीतही कोणता बदल नसेल.
होऊ शकते अडचण
आतापर्यंत तुम्ही 120 दिवस आधी तिकिट बुकींग करु शकत होता. त्यामुळे वेळ मिळायचा आणि वेटींग तिकीट कन्फर्म होण्यासाठी वेळ मिळायचा. पण हा कालावधी 60 दिवसांवर केल्याने बुकींगसाठी अचानक गर्दी होईल. वेटींग तिकीट कन्फर्म होण्याचे चान्सही फार कमी होतील. पूर्वांचल आणि बिहारच्या मार्गावर 4 महिने आधीच रिझर्व्हेशन फूल होऊन जाते.
रेल्वेकडून वारंवार एजंटवर होतेय कारवाई
रेल्वे तिकीट बुकींग सोपी व्हावी आणि सर्वांना तिकीट मिळावी यासाठी रेल्वेकडून वारंवार प्रयत्न केले जातात. अवैध पद्धतीने तिकीट बुकींग करणाऱ्या एजंट विरोधात रेल्वेकडून करड कारवाई केली जाते. सुविधा आणखी सोप्या बनाव्या, यासाठी रेल्वे प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले आहे.