Indian Railway Highest Earning Train:  रेल्वे हे भारतातील सर्वात सुलद, जलद आणि स्वत, सर्वांना परवडणारे वाहतूकीचे प्रमुख माध्यम आहे. भारतीय रेल्वेचे जाळे संपूर्ण देशता पसरले आहे. काश्मिर पासून कन्याकुमीपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे धावते. दैनंदिन लाखो प्रवासी भारतील रेल्वेने प्रवास करतात. देशभरात दैंनदिन हजारो ट्रेन धावतात.  भारतातील सर्वात जास्त कमाई करणारी ट्रेन कोणती आहे ते माहित आहे. ही ट्रेन भरादतीय रेल्वेची धनलक्ष्मी म्हणून ओळखली जाते. या ट्रेनेची वर्षभराची कमाई 1,76,06,66,339 इतकी आहे. जाणून घेऊया ही ट्रेन कोणती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शताब्दी एक्स्प्रेस ही भारतातील सर्वात लोकप्रिय ट्रेन. तर भारतीय रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालेली वंदे भारत ट्रेन देखील चांगलीच चर्चेत आहे. या ट्रेन जितक्या लोकप्रिय आहेत तितक्या या ट्रेन कमाई करत नाहीत. भारतीतील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या ट्रेनच्या या यादीत शताब्दी एक्स्प्रेस वंदे भारत या ट्रेन स्थान मिळवू शकलेल्या नाहीत. 


बेंगळुरू राजधानी एक्सप्रेस ही भारतातील सर्वात जास्त कमाई करणारी टट्रेन आहे. 22692 या क्रमांकाची बंगलोर राजधानी एक्सप्रेस ट्रेन ही हजरत निजामुद्दीन ते KSR बेंगळुरू असा प्रवास करते. 2022-23 या आर्थिक वर्षात जवळपास 509510 प्रवाशांची या या ट्रेनने प्रवास केला. या एका ट्रेनने रेल्वेला वर्षभरात 1,76,06,66,339 इतके उत्पन्न मिळवून दिले आहे. 


40,11,019... पाणीपुरी विक्रेत्याचे PHONEPE आणि RAZORPA चे पेमेंट रेकॉर्ड पाहून आयकर अधिकारी चक्रावले


सियालदह राजधानी एक्सप्रेस ही ट्रेन सर्वाधिक कमाई करणाऱ्या रेल्वेच्या यादीत दुसऱ्य स्थानावर आहे. ही ट्रेन पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आणि राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली या मार्गावर प्रवास करते. 12314 या क्रमांकाची   सियालदह राजधानी एक्स्प्रेसने 2022-23 या वर्षात 5,09,164 प्रवाशांनी प्रवास केला.  या ट्रेनची वर्षाची कमाई 1,28,81,69,274 इतकी आहे.  नवी दिल्ली ते दिब्रुगड दरम्यान धावणारी दिब्रुगडची राजधानी तिसऱ्या क्रमांकावर आहे. या ट्रेनने गेल्या वर्षी 4,74,605 प्रवाशांनी प्रवास केला. या ट्रेनची 1,26,29,09,697 रुपयांची कमाई झाली. 


हे देखील वाचा....  GK : जगातील एकमेव गाव जिथं घराबाहेर पार्क केलेली असतात विमानं; इथले लोक बाजारातही विमानानेच जातात


नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल दरम्यान धावणारी मुंबई राजधानी एक्सप्रेस ही सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 ट्रेनच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. ट्रेन क्रमांक 12952 मुंबई राजधानी एक्स्प्रेसने 2022-23 या वर्षात 4,85, 794 प्रवाशांनी प्रवास केला आहे. यामुळे रेल्वेच्या खात्यात 1,22,84,51,554 इतकी कमाई केली आहे.