Indian Railway : रेल्वेनं प्रवास करत असताना हा प्रवास जर लांबचा असेल तर, तासनतास एकाच ठिकाणी बसून न राहता काही मंडळी ट्रेनमध्ये फेरफटका मारतात. रेल्वेगाडीच्या दारापाशी जाऊन उभे राहतात. रेल्वेगाडी तिच्या अपेक्षित स्थानकाकडे कूच करत असताना त्यातून प्रवास करणाऱ्यांचीसुद्धा आपआपली कामं सुरु असतात. त्यात रेल्वे कर्मचारीही आलेच. प्रवाशांना खाणं-पिणं पुरवण्यापासून त्यांना अंथरून पांघरुण देण्यापर्यंतची काळजी ही मंडळी घेतात. पण, याच रेल्वेसाठी काम करणाऱ्या हाउसकीपिंग स्टाफ (housekeeping staff) चा एक व्हिडीओ सध्या सर्वांनाच अस्वस्थ करत आहे. 


रेल्वेतील हाउसकीपिंग स्टाफ (housekeeping staff)चा अस्वस्थ करणारा व्हिडीओ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच सोशल मीडियावर @mumbaimatterz या अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये रेल्वेत काम करणारे हाउसकीपिंग टीममधील कर्मचारी धावत्या ट्रेनमधून कचऱ्यानं भरलेल्या बॅगा थेट रुळांवर ओतताना, रिकाम्या करताना दिसत आहेत. इतकंच नव्हे, तर ही मंडळी वायपरचा वापर करत भोजनातील खरकटं आणि तत्सम कचराही रुळांवर टाकताना दिसत आहेत. 


हेसुद्धा वाचा :  Diabetes चे रुग्ण रताळं खाऊ शकतात का? पाहा आहारतज्ज्ञ काय सांगतात 


व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या अकाऊंटवर देण्यात आलेल्या कॅप्शननुसार एका प्रवाशानं 139 या हेल्पलाइन क्रमांकावर याबाबतची तक्रार केली आणि याची माहिती मिळताच रेल्वे पर्यवेक्षक आणि त्यांच्या टीमनं तक्रार का आणि कोणी केली याचा शोध घेऊ लागले. 'आम्हाला पुरेसा पगार मिळत नाही, कचऱ्यासाठी पुरेशा पिशव्या दिल्या जात नाहीत त्यामुळं आहे त्यातच आम्ही भागवतोय', असा सूर त्या मंडळींनी आळवल्याचं या कॅप्शनमध्ये सांगितलं गेलं. 




पोस्ट व्हायरल होताच रेल्वेची प्रतिक्रिया 


रेल्वेतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या या अस्वस्थ करणाऱ्या पद्धतीचा व्हिडीओ व्हायरल होताच रेल्वे विभागानं यात लक्ष घातलं आणि मुंबई डिवीजन-सेंट्रल रेल्वेनं त्यावर उत्तर दिलं. सदरील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी रेल्वेनं पीएनआर आणि ट्रेन क्रमांक देण्याची विनंती केली. ज्यानंतरच्या ट्विटमध्ये संबंधित व्यक्तीला ओळखून त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचंही स्पष्ट केलं.