Indian Railways Interesting Facts : भारतीय रेल्वेचं (Indian Railways ) मोठं जाळ पसरलं आहे. भारतातील असंख्य लोक ट्रेनने (train) प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या ट्रेनमुळे प्रवास (travel) हा सुखकर आणि कमी खर्चात होतो. शिवाय आपण त्यात हवं तेवढं सामान घेऊन जाऊन शकतो. सध्या क्रिसमस आणि न्यू इयरसाठी (Christmas and New Year 2022) अनेक जण सहलीवर जाण्याचा प्लॅन करतात. मग अशावेळी जर तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल तर तुम्हाला ट्रेनबद्दलचे हे नियम (indian railway rules) माहिती असले पाहिजे. कारण जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करताना या 4 गोष्टी घेऊन जात असाल तर तुम्हाला तुरुंगाची (Jail) हवा भोगावी लागू शकते. 


ऍसिडची बाटली (Acid)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रेल्वेच्या ट्रेनमध्ये ऍसिडची बाटली नेण्यास पूर्णपणे बंदी आहे. जर एखादा प्रवासी असं करताना पकडला गेला तर त्याला रेल्वे कायद्याच्या कलम 164 अंतर्गत तात्काळ अटक केली जाऊ शकते. या कलमांतर्गत अॅसिडची बाटली बाळगल्याबद्दल तुम्हाला 1,000 रुपयांचा दंड किंवा 3 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.  (indian railway interesting facts and rules Trending News 
Dont carry 4 things by mistake traveling and jail)


स्टोव्ह किंवा गॅस सिलेंडर (Stove or Gas Cylinder)


इतर ठिकाणी काम करणारे लोक घरी परतताना अनेकदा स्टोव्ह आणि सिलिंडर सोबत घेऊन जातात. ट्रेनमध्ये गॅस सिलिंडर आणि स्टोव्ह घेऊन जाणे रेल्वे कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. जर तुम्ही ट्रेन प्रवासादरम्यान भरलेलं सिलिंडर नेलं तर तुम्हाला तुरुंगवास आणि कडक दंडाला सामोरे जावं लागू शकतं. 


फटाके (Crackers)


ट्रेनमधून फटाके घेऊन जाण्यावर पूर्णपणे बंदी आहे. फटाक्यांच्या स्फोटामुळे ट्रेनमध्ये आग आणि जीवितहानी होऊ शकते. या नियमाचं उल्लंघन केल्यास मोठा दंड तसंच तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 


शस्त्रे  (Weapons)


तुम्ही तलवार, चाकू, भाला, खंजीर, रायफल किंवा परवानाकृत शस्त्रे वगळता इतर कोणतीही प्राणघातक शस्त्रे ट्रेनमध्ये नेऊ शकत नाही. जर तुम्ही हा नियम मोडल्यास रेल्वे कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो. ज्याचा फटका तुम्हाला सहन करावा लागेल. अशा परिस्थितीत अशा शस्त्रांपासून अंतर ठेवून प्रवास केल्यास बरे होईल. 


प्लॅटफॉर्मवर पिवळा पट्टा (Yellow belt) का असतो?


तुम्ही पाहिलं असेल रेल्वे प्लॅटफॉर्मवरील ही पिवळ्या रंगाची पट्टी असते आणि ती पृष्ठभागावरुन थोडी उंच असते. याचा मागे कारण आहे ते दृष्टिहीन व्यक्तींच्या सुरक्षेसाठी...जेव्हा दृष्टिहीन व्यक्ती प्लॅटफार्मवरून चालत असताना रेल्वे रुळावर पडू नये म्हणून त्यांचासाठी हा इशारा असतो. जेणे करून ते कोणाचीही मदत न घेता सुरक्षेत अंतराने चालतात.