Indian RailwayToilet Story: देशात रेल्वे प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. देशांतर्गत लांब पल्ल्याचे अंतर गाठण्यासाठी बहुतांश लोक रेल्वेचा पर्याय निवडतात. कारण रेल्वे प्रवास अतिशय स्वस्त आणि आरामदायी आहे. या प्रवासादरम्यान आपल्याला जेवण, पाणी आणि इतर अनेक गोष्टी ट्रेनमध्येच मिळतात. प्रवाशांना फ्रेश होण्यासाठी बाथरूम देखील मिळते. पण तुम्हाला माहीत आहे का की ट्रेनमध्ये पहिले बाथरूम कधी बसवण्यात आले?  एका भारतीयाच्या पत्रामुळे ट्रेनच्या आत बाथरूम बसवण्यात आले होते. ही रंजक कहाणी जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटिश रेल्वेला 1919 मध्ये असे पत्र मिळाले होते. त्यानंतर ब्रिटिशांना ट्रेनमध्ये शौचालय बांधण्याचा विचार करण्यास भाग पाडले गेले. या भारतीयाचे नाव ओखिल चंद्र सेन होते. एका समस्येमुळे ओखिल यांनी भारतीय रेल्वेला पत्र लिहिले जे आजही प्रसिद्ध आहे.


ओखिल चंद्र सेन यांनी पत्रात लिहिले होते की आदरणीय सर, मी ट्रेनने अहमदपूर स्टेशनवर आलो. त्यावेळी मला पोटाचा त्रास होता. मी टॉयलेट वापरायला बसलो, इतक्यात ट्रेन निघाली आणि माझी ट्रेन चुकली. गार्डने माझी वाट पाहिली नाही. माझ्या एका हातात भांडे होते आणि दुसर्‍या हाताने धोतर धरून मी धावत सुटलो आणि प्लॅटफॉर्मवर पडलो आणि माझे धोतरही उघडे पडले आणि तिथल्या सर्व स्त्री-पुरुषांसमोर मला लाज वाटायला लागली आणि माझी ट्रेनही चुकली. त्यामुळे मी अहमदपूर स्टेशनवरच राहिलो. टॉयलेटला गेलेल्या एका प्रवाशाला रेल्वे गार्डने काही मिनिटंही थांबवले नाही, ही इतकी वाईट आणि खेदाची गोष्ट आहे. मी तुम्हाला विनंती करतो की त्या गार्डला दंड आकारावा अन्यथा मी हे वर्तमानपत्रात सांगेन, असे ओखिल चंद्र सेन यांनी सांगितले.



ओखिल यांनी पाठवलेल्या पत्राचा ब्रिटिशांनी गांभीर्याने विचार केला. याचा विचार करून रेल्वे गाड्यांमध्ये तात्काळ शौचालये बसवण्याचे आदेश देण्यात आले. ओखिल चंद्र सेन यांच्यामुळेच आज भारतीय ट्रेनमध्ये टॉयलेटची सुविधा आहे. त्यामुळे 100 वर्षानंतर आपला प्रवास सुखकर होतो.