नवी दिल्ली : भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची इच्छा असल्यास, आता नवीन संधी उपलब्ध होणार आहे. भारतीय रेल्वे इरकॉन इटरनॅशनल लिमिटेडने (IRCON International Limited) ग्रॅज्युएट एप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) आणि टेक्निशियन (डिप्लोमा) एप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी उमेदवार निर्धारित फॉर्मेट अंतर्गत १५ फेब्रुवारी २०२० पर्यंत अर्ज करु शकतात. या पदांबाबत अधिक माहितीसाठी इरकॉनच्या वेबसाइटवरुन माहिती मिळवता येऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इरकॉन इटरनॅशनल लिमिटेडद्वारे (IRCON International Limited) एम्पलॉयमेंट न्यूजमध्ये  (Employment News) या पदांसाठी १५ फेब्रुवारी २०२० पर्यंत अर्ज करता येणार आहे.


इरकॉनने इतक्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत -


ग्रॅज्युएट एप्रेंटिस ४१ पदं
सिव्हिल ट्रेड ३२ पदं
इलेक्ट्रिकल ट्रेड ७ पदं
सिग्नल ऍन्ड टेलिकॉम ट्रेड २ पदं


टेक्निशियन (डिप्लोमा) एप्रेंटिससाठी एकूण ३५ पदं
यामध्ये २५ सिव्हिल पदं
९ पदं इलेक्ट्रिकल
सिग्नल ऍन्ड टेलिकॉमसाठी १ पद


शैक्षणिक पात्रता - 


ग्रॅज्यूएट एप्रेंटिस - इंजिनियरिंग/ टेक्नोलॉजीमध्ये मान्यताप्राप्त संस्थेतून फुल टाईम ग्रॅज्यूएट डिग्री
टेक्निकल (डिप्लोमा) एप्रेंटिस - इंजिनियरिंग/ टेक्नोलॉजीमध्ये मान्यताप्राप्त संस्थेतून फुल टाईम डिप्लोमा


वयोमर्यादा -


कमीत कमी १८ वर्ष ते अधिकाधिक ३० वर्षे


वेतन -


ग्रॅज्यूएट एप्रेंटिस - १० हजार रुपये प्रति महिना
टेक्निकल (डिप्लोमा)  एप्रेंटिस - ८,५०० रुपये प्रति महिना