Indian Railway New Rules : (Asia) आशिया खंडातील सर्वात मोठं आणि विस्तीर्ण असं भारतीय रेल्वेचं जाळं इतक्या दूरवर पसरलं आहे की काही स्थानकांची नावं तर अनेकांना ठाऊकही नाहीत. देशाच्या एका टोकाला दुसऱ्या टोकाशी जोडणाऱ्या या (Indian Railway) भारतीय रेल्वेतून समाजाच्या प्रत्येक श्रेणीतील व्यक्तीला प्रवास करण्याची संधी मिळते. अगदी राजमहालातील राजेशाही थाटसुद्धा तुम्हाला याच रेल्वेमध्ये अनुभवता येतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवाशांनी सुविधेचा उल्लेख करायची खोटी की पुढच्याच क्षणी रेल्वेकडून त्यांच्या मागणीच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा सुरु होतो. प्रवाशांनाच केंद्रस्थानी ठेवत रेल्वे विभागाकडून आजवर सातत्यानं नव्या तंत्रज्ञानाचीही साथ घेतली गेली. अशा या Indian Railway कडून आता प्रवाशांच्याच हितासाठी आणखी काही मोठे निर्णय घेण्यात आले आहे. रेल्वेनं प्रवास करताना लागू असणाऱ्या काही नियमांसंदर्भात हे निर्णय घेण्यात आले आहेत. 


आता तुम्ही म्हणाल रेल्वेनं आम्ही इतक्या वर्षांपासून प्रवास करतोय, आम्हाला सर्व नियमांची कल्पना आहे. पण, ही चूक करू नका. कारण, नव्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदलही करण्यात आले असून, एक प्रवासी म्हणून तुम्हाला या नियमांची कल्पना असणं अपेक्षित आहे. 


कोणासाठी हे नियम? 


भारतीय रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या या नियमांमध्ये अशा अनेक तरतुदी आहेत ज्यांचं पालन प्रवासी, टीटीई, केटरिंग क्रू आणि इतर सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांनी करावं. 


काय आहेत हे नियम? 


- मिडल बर्थनं प्रवास करणारे प्रवासी कधीही त्यांची सीट उघडून वापरू शकतात. खालच्या म्हणजेच लोअर बर्थवरील प्रवाशांना याबाबतची तक्रार करता येणार नाही. 
- रात्री 10 वाजल्यानंतर टीटीई प्रवाशांकडून तिकीट तपासू शकत नाहीत. 
- रात्री रेल्वेमध्ये असणारे दिवे वगळता कोणाही प्रवाशानं Light On करू नये. 
- अनेकजणांसमवेत प्रवास करत असल्यास रात्री 10 नंतर आपल्या Group चा इतर प्रवाशांना त्रास होणार नाही, यासाठी धीम्या आवाजत संवाद साधा. 
- दूरध्वनीवर संपर्क साधताना मोठमोठ्यानं बोलण्याची प्रवाशांना परवानगी नाही. 
- हेडफोन नसल्यास मोठ्या आवाजात गाणी किंवा तत्सम संगीत प्रकार ऐकण्याची परवानगी नाही. 


हेसुद्धा वाचा : Health Tips : कोशिंबीरीत काकडी- टोमॅटो एकत्र वापरताय? तुम्ही नकळतच संकट ओढावताय 


 


नियमांची ही रांग इथंच थांबत नाही, कारण सामानासंर्भातील नियमांमध्येही रेल्वे विभागाकडून काही बदल करण्यात आले आहेत. आतापर्यंत रेल्वेनं प्रवास करतेवेळी कधीच प्रवाशांना सामानाच्या वजनावर प्रतिबंध लावण्यात आले नव्हते. पण, आता मात्र Sleeping Class मधून प्रवास करतेवेळी 40 किलो आणि Second Class मधून प्रवास करतेवेळी 35 किलो इतकंच सामान प्रवाशांना मोफत नेता येणार आहे. त्याहून जास्तीच्या सामानासाठी अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल.