ट्रेनच्या मिडील बर्थ सिटचे हे नियम तुम्हाला माहित आहेत का? लगेच माहित करुन घ्या
रेल्वे प्रवासासाठी ट्रेनची तिकीट घेतली आणि तुम्हाला रेल्वेच्या मधल्या बर्थची तिकीट मिळाली तर तुमच्यासाठी वेगवेगळे नियम लागू होतात.
मुंबई : आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यातून एकदातरी ट्रेनने प्रवास केला असेलच. ट्रेनने शक्यतो आपण लांबचा प्रवास करतो, त्यामुळे त्याचे तिकीट कन्फर्म होणे गरजेचे असते, ज्यामुळे विना टेन्शन आरामात आपण प्रवास करु शकतो. यासाठी लोकां काही महिन्यांपूर्वीच आपले तिकीट बुक करतात. परंतु होतं काय की, आपल्याला काही वेळेला मिडल बर्थमधील तिकीट मिळते. परंतु होते काय तर मिडल बर्थ मधील लोकांची थोडी गैरसोय होते कारण त्यांना जर त्यांचे बर्थ खोलून झोपायचे असेल, तर त्यांना त्याचे खरे नियम माहित नसतात ज्यामुळे त्यांची गैरसोय होते.
जर तुम्ही रेल्वे प्रवासासाठी ट्रेनची तिकीट घेतली आणि तुम्हाला रेल्वेच्या मधल्या बर्थची तिकीट मिळाली तर तुमच्यासाठी वेगवेगळे नियम लागू होतात. म्हणूनच तुम्हाला याच्या नियमांची जाणीव असणे आवश्यक आहे, अशा स्थितीत, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, मिडल बर्थसाठी कोणते नियम आहेत, ज्यांची काळजी घेतली पाहिजे.
भारतीय रेल्वेने मधल्या बर्थसाठी काही नियम ठरवले आहेत. या नियमांनुसार, जर तुम्हाला मधल्या बर्थचे तिकीट मिळेले असेल, तर तुम्ही ते 24 तास वापरू शकत नाही. तुम्ही त्याला फक्त रात्रीच वापरु शकता. बाकीच्या वेळेला तुम्हाला ते बंद ठेवावे लागेल.
रेल्वेच्या नियमांनुसार, मध्य बर्थ असलेला प्रवासी रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंतच आपल्या बर्थमध्ये झोपू शकतो. जर एखाद्या प्रवाशाला रात्री 10 च्या आधी मधली बर्थ उघडणे थांबवायचे असेल तर त्याला थांबवले जाऊ शकते. त्याच वेळी, सकाळी 6 नंतर, बर्थ खाली करावा लागेल जेणेकरून इतर प्रवासी खालच्या बर्थवर बसू शकतील.