Indian Railway : विमान प्रवासांदरम्यान सहप्रवाशांवर लघुशंका केल्यानं काही मद्यधुंद प्रवासी आणि त्यांचे कारनामे काही महिन्यांपूर्वी बरेच चर्चेत आले होते. अद्यापही चर्चा शमलेल्या नसतानाच पुन्हा एकदा अशाच एका घटनेमुळं खळबळ माजली आहे. एका धक्कादायक घटनेमध्ये मद्यधुंद अवस्थेतील Travel Ticket Examiner (TTE) टीटीईनं महिला प्रवाशावर लघुशंका केल्याची घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे पोलिसांचा (Railway Police) हवाला देत एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं. सदर महिला तिच्या पतीसह अमृतसरहून कोलकाता रोखानं प्रवास करत होती. प्राथमिक माहितीनुसार अमृतसरहून कोलकाता दिशेनं निघालेल्या  अकाल तख्त एक्स्प्रेसच्या A1 कोचमध्ये रविवारी रात्री हा प्रकार घडला. यादरम्यान टीटीई मुन्ना कुमार (बिहार) मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती उघडकीस आली. 


ट्रेन लखनऊ येथे पोहोचण्यापूर्वी महिलेच्या आवाजामुळं सहप्रवाशांना घडल्या प्रकाराची कल्पना आली आणि त्यांनी त्या टीटीईला घेरलं. यानंतर ट्रेन चारबाग रेल्वे स्थानकात पोहोचताच टीटीईला GRP च्या ताब्यात देण्यातआलं. सध्याच्या घडीला त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 


काही महिन्यांपूर्वी विमान प्रवासातही घडलेला असाच प्रकार 


काही महिन्यांपूर्वी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानात बिझनेस क्लासमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. जिथं विमानानं उड्डाण केल्यानंतर विमानातील वातावरण शांतच होतं. पण, काही वेळातच भान हरपलेल्या, नशेच्या अधीन असणारा एक प्रवासी विमानातील महिलेच्या आसनापाशी गेला आणि त्यानं पँटची झीप उघडून तिच्यावर लघुशंका केली. या प्रकरणी बऱ्याच चर्चा होऊन पुढं कारवाईची मागणीही झाल्याचं पाहायला मिळालं होतं. 


हेसुद्धा वाचा : Goa News : पार्टीचा विचारच सोडा... गोव्या नवा नियम लागू, सरकारनं उचलली कठोर पावलं 


 


इतकंच नव्हे, तर त्या महिलेनं सदर प्रकरणी संताप व्यक्त केला होता. इतकंच नव्हे तर रितसर पोलीस तक्रार होऊन आक्षेपार्ह वर्तणूक करणाऱ्या त्या प्रवाशाला नो फ्लाय लिस्टमध्ये टाकण्याची शिफारसही करण्यात आली होती.