Indian Railway Ticket : भारतीय रेल्वेनं दर दिवशी असंख्य प्रवाशी अपेक्षित आणि निर्धारित स्थानकांवर पोहोचतात. देशातील प्रत्येक कोपऱ्याला, अगदी दुर्गम भागांना एकमेकांशी जोडणारी हीच रेल्वे सुविधा अनेकांसाठीच मोठ्या मदतीची. आशिया खंडातील दुसऱ्या आणि जगातील चौथ्या क्रमांकाच्या रेल्वे जाळ्यानं एकिकडे भारताला प्रगतीपथावर नेण्यास मोलाची भूमिका बजावली असतानाच दुसरीकडे प्रवाशांवर विविध सुविधांची बरसातही केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत रेल्वे विभागाच्या वतीनं कायमच काही खास प्रवाशांना तिकीट दरात सवलती देण्याक आल्या. कोरोना काळानंतर मात्र रेल्वेनं ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात मिळणाऱ्या सवलतीसंदर्भातील नियम शिथिल केला. पण, आजही असे अनेक प्रवासी आहेत ज्यांना रेल्वेकडून तिकीट दरामध्ये 75 टक्के सवलत दिली जाते. 


रेल्वेकडून ज्या प्रवाशांना तिकीटदरात सवलत दिली जाते त्यामध्ये विद्यार्थ्यांपासून काही आजारांनी पीडित असणाऱ्यांचा समावेश आहे. दिव्यांग, बौद्धिकदृष्ट्या कमकुवत आणि पूर्णपणे नेत्रहिन असणाऱ्या प्रवाशांना तिकीटदरात मोठी सवलत दिली जाते. या व्यक्तींसोबत कोणीही नसल्यास त्यांना प्रवास करता येत नाही. अशा प्रवाशांना जनरल क्लास, स्लीपर आणि 3AC च्या तिकीट दरांमध्ये 75 टक्क्यांची सवलत दिली जाते. 


1AC आणि 2AC मध्ये या प्रवाशांना 50 टक्के सवलत दिली जाते. तर, राजधानी, शताब्दी यांसारख्या प्रिमियम रेल्वे गाड्यांमध्ये रेल्वे विभागाकडून 25 टक्क्यांची सवलत दिली जाते. 3एसी आणि एसी चेअर कारमध्ये ही सवलत लागू असते. 


हेसुद्धा वाचा : 'आता त्याचं लग्न झालंय' अभिषेकसोबत नाव जोडलं जाणारी अभिनेत्री असं का म्हणालेली? बी टाऊनमध्ये चर्चांना उधाण 


रेल्वेच्या वतीनं पूर्णपणे मूकबधिर प्रवाशांनाही तिकीटात 50 रुपयांची सवलत दिली जाते. त्यांच्यासमवेत प्रवास करणाऱ्या व्यक्तीलाही ही सवलत लागू असते. त्याव्यरितिक्त विविध आजारपणं किंवा व्याधी अर्थात थॅलेसेमिया, कर्करोग, हृदयरोग, किडनीचे विकार, हेमोफिलिया, एड्स, ओस्टोमी, अॅनेमिया, अपाल्टीक अॅनेमिया अशा व्याधी असणाऱ्यांनाही रेल्वेकडून तिकीटात सवलत दिली जाते. 


रेल्वे तिकीटावर विविध घटकांना विविध प्रमाणात सवलती लागू असतात. यामध्ये विद्यार्थ्यांचा आणि प्रवासाला निघालेल्या किंवा मूळ गावी परतलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. तिकीटावर आपल्याला नेमकी किती सवलत आहे जे जाणून घेण्यासाठी https://www.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.